Nashik Car Rental Spam
नवीन नाशिक — अंबड पोलिस ठाणे हद्दीत विश्वास संपादन करून भाड्याने घेतलेल्या वाहनांची फसवणूक केल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १७ लाख रुपये किमतीच्या दोन चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या असून, लोकेश गाजरे या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादींच्या माहितीनुसार, त्यांच्या मित्रांनी “बहिणीच्या लग्नासाठी” वापरण्याचे सांगून रेनॉल्ट कायझर आरएक्स ही कार जळगाव येथे नेली होती. मात्र, वारंवार संपर्क करूनही वाहन परत करण्यात आले नाही. दुसऱ्या घटनेत, शुभम पार्क परिसरातील टाटा टियागो कार देखील वापरण्यासाठी घेतल्यानंतर परत न करण्यात आल्याचे समोर आले आहे.
दोन्ही प्रकरणांत आरोपींनी मित्रांचा विश्वासघात करून वाहनांचा गैरवापर केल्याने अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला. (Nashik Car Rental Spam)
सहायक पोलिस निरीक्षक विलास पडोळकर यांना आरोपी भुसावळ येथे असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याने दोन्ही वाहने गोलू सोनार आणि हर्षल पाटील यांच्याकडे गहाण ठेवली असल्याचे कबूल केले.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही वाहने जप्त केली आहेत. या वाहनांची एकूण किंमत सुमारे १७ लाख रुपये असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Nashik Car Rental Spam)
MHDU News : Vishal Bhadane Nashik Car Rental Spam



[…] […]
So, I was checkin’ out 16betbr1 the other day, and it’s got that certain…something. Not the flashiest, but gets the job done. Good for a casual punt, maybe. Give it a looksee yourself at 16betbr1.
Trying my luck with cc6ph4! Anyone else here already? Good vibes and hoping for some wins! Check out cc6ph4.