Nashik Kalvan News :
नाशिकच्या कळवण मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आदिवासी शेतमजुराच्या अपहरण आणि खून प्रकरणात संशयितांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेलं आंदोलन हिंसक झालं आहे. संतप्त आदिवासी जमावाने थेट कळवण पोलीस स्थानकावर (Kalvan Police Station) दगडफेक केली असून यात अनेक पोलीस आणि पत्रकार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Nashik Kalvan News
झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ बघा 👇
घटनेची सुरुवात कळवण खुर्द येथील शेतकऱ्यावर शेतमजूर विठोबा पवार यांच्या अपहरण आणि खूनाचा आरोप करण्यात आला, त्यावर संशयितांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी स्थानिक आदिवासी बांधवांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनादरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या शाब्दिक वादानंतर परिस्थिती बिघडली आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला असता संतप्त जमावाने थेट पोलीस ठाण्यावर दगडफेक केली.
दगडफेकीत पोलिस आणि पत्रकार जखमी झाले असून, पोलीस वाहनांच्या काचाही फुटल्याचे दिसून आले. घटनेनंतर परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी अपहरण प्रकरणातील संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
नवीन ताज्या घडामोडी 👇: Nashik Kalvan News : Tribal Protest Turns Violent – नाशिकच्या कळवण मध्ये धक्कादायक प्रकार पोलीस स्थानकावर दगडफेक; पोलिसांसह पत्रकार जखमीपत्नी प्रियकर API सोबत कारमध्ये रंगेहाथ पकडली, संतप्त पतीने भर रस्त्यात केली चोपाई

