त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. पत्रकार किरण ताजने, योगेश खरे व अभिजीत सोनवणे यांना निर्दय मारहाण करण्यात आली आहे.
मारहाणीचा संपूर्ण व्हिडिओ पाहा 👇
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकारितेसाठी जात असताना स्वामी समर्थ मठाजवळ पार्किंगमध्ये पावतीची मागणी करण्यात आली. त्यावेळी पत्रकार योगेश खरे यांनी “आम्ही पत्रकार आहोत” असे सांगितले. यावरून पावती घेणाऱ्यांनी टोळकी गोळा करून तिघा पत्रकारांवर हल्ला केला. (Journalist Attack )
🖊️ पत्रकार हा नेहमी लोकहितासाठी लढणारा सैनिक असतो.
📢 पत्रकारांवर होणारा कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही.
👮 प्रशासनाने तात्काळ या प्रकरणी कडक बंदोबस्त व कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी आहे.
पत्रकार सुरक्षेला गालबोट लावणाऱ्या अशा घटना असह्य व अमान्य आहेत.
महाराष्ट्रातील सर्व पत्रकार या घटनेचा एकदिलाने तीव्र निषेध करतात.


[…] Journalist Attack […]
[…] Related News : Journalist Attack in Trimbakeshwar Nashik – तीव्र निषेध व्यक्त […]