Girish Mahajan Nashik Trimbakeshwar Road Inspectionनाशिक–त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणाची पाहणी करताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन; नागरिकांना दिले नुकसान न होण्याचे आश्वासन.

Girish Mahajan Nashik Trimbakeshwar Road Inspection

नाशिक, दि. ५ नोव्हेंबर 2025 : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी नाशिक–त्र्यंबकेश्वर रस्त्याची पाहणी केली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज आहिरे, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक महापालिका आणि त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते. (Girish Mahajan Nashik Trimbakeshwar Road Inspection )

मंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकास कामांमध्ये रस्त्यांची कामे अत्यंत महत्त्वाची आहेत. त्र्यंबकेश्वर येथे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येतात, त्यामुळे नाशिक–त्र्यंबकेश्वर रस्ता हा अत्यंत महत्वाचा मानला जातो.

रस्ता रुंदीकरण करताना नागरिक आणि शेतकऱ्यांच्या मागण्या विचारात घेतल्या जातील, असे त्यांनी नमूद केले. नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, अशी भूमिका शासनाने घेतली असून, सर्वानुमते निर्णय घेऊन रस्ता रुंदीकरणाची दिशा ठरवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (Girish Mahajan Nashik Trimbakeshwar Road Inspection )

यावेळी मंत्री महाजन यांच्या उपस्थितीत रस्त्याच्या मोजणीची पाहणी करण्यात आली आणि बाधित होणाऱ्या क्षेत्राची तपशीलवार माहिती घेण्यात आली. तसेच त्यांनी नागरिकांना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधून दिला, ज्यात रस्त्याशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा झाली.

MHDU News : Vishal Bhadane Girish Mahajan Nashik Trimbakeshwar Road Inspection

Girish Mahajan Nashik Trimbakeshwar Road Inspection
त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणाची पाहणी करताना जलसंपदा मंत्री गिरी Girish Mahajan inspects Nashik–Trimbakeshwar road works
महाजन; नागरिकांना दिले नुकसान न होण्याचे आश्वासन.

Rahul Dhikale Nashik BJP Election Charge : नाशिक महापालिका निवडणुकीची धुरा राहुल ढिकलेंकडे; ‘100 प्लस’चे भाजपचे लक्ष्य!

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

3 thoughts on “Girish Mahajan Nashik Trimbakeshwar Road Inspection : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नाशिक–त्र्यंबकेश्वर रस्त्याची पाहणी; नागरिकांचे नुकसान होणार नाही – आश्वासन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *