Dongrale Case Nashik Protest
नाशिक : डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेल्या अमानवी अत्याचारानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोर संतप्त युवकाने अचानक रास्ता रोखत आरोपीला फाशीची मागणी केली. (Dongrale Case Nashik Protest)
ताफा थांबताच एकनाथ शिंदे यांनी त्या युवकाची भेट घेऊन त्याच्या भावना शांतपणे ऐकून घेतल्या. संतापलेल्या युवकाने “एका दिवशी सरकार बदलू शकतं, मग दोषीला फाशी का मिळू नये?” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत सरकार मागे हटणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. तसेच, हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून दोषीला कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
डोंगराळे येथे १६ नोव्हेंबर रोजी तीन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. मालेगावात नागरिकांनी न्यायालयात घुसण्यापर्यंत आक्रोश व्यक्त केला होता. (Dongrale Case Nashik Protest)
दरम्यान, पीडित कुटुंबाला सरकारकडून ‘मनोधैर्य’ योजनेतून १० लाखांची मदत मंजूर करण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. (Dongrale Case Nashik Protest)
MHDU News : Vishal Bhadane
मालेगाव तालुक्यात 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, दगडाने ठेचून निर्घृण हत्या


789pvip looks interesting, gotta say. Their VIP program seems enticing. Anyone here a member? Wanna hear your experiences with using 789pvip!
Ok9o! Heard a few things, decided to check it out. Not too shabby. Nice user interface. Give it a shot at ok9o