Dhule Farmer Tower Protest
धुळे जिल्ह्यातील मेथी गावात एका शेतकऱ्याने आपल्या न्याय हक्कासाठी थेट मोबाईल टॉवरवर चढत आंदोलन सुरू केले आहे. तब्बल 13 वर्षांपूर्वी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला अद्याप न मिळाल्याने हा शेतकरी आक्रमक झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी घेतलेली जमीन परस्पर सौर प्रकल्पासाठी वापरली जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या संदर्भात मागील आंदोलनावेळी पालकमंत्र्यांनी एकरी 2 लाख रुपये आणि अधिग्रहित जमिनीच्या प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, 15 दिवस उलटूनही आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. सध्या संबंधित शेतकरी तब्बल 6 तासांपासून टॉवरवर चढून आंदोलन करत आहे. प्रशासनाकडून चर्चा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र अद्याप शेतकरी उतरायला तयार नाही.(Dhule Farmer Tower Protest)
शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की — “मागण्या पूर्ण न झाल्यास आत्मदहन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.”
या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी झाली असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
MHDU News : Vishal Bhdane Dhule Farmer Tower Protest
Dhule Khalane Danger Dumper Accident : धुळे-खलाणे बसस्थानकावर डंपरची धडक — 2 ठार, 2 गंभीर जखमी
Dhule #FarmerProtest #MaharashtraNews #BreakingNews #MHDUnews #mhdusocial


win2023bet1 looks like a new site. I’m always a bit cautious with new ones, but hey, gotta explore, right? Testing it out, will report back. The link’s here: win2023bet1