Dada Bhuse Voter List Reply
धुळे : लोकसभा निवडणुकीत याच मतदार याद्यांच्या आधारे विरोधकांना विजय मिळाला तेव्हा त्या योग्य वाटल्या; अशा शब्दांत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विरोधकांच्या मतदार याद्या दुरुस्तीवरील आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
पिंपळनेर (ता. साक्री) येथे झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण व शाखा उद्घाटन तसेच पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
मंत्री दादा भुसे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत याच मतदार याद्यांच्या आधारे विरोधकांना विजय मिळाला होता, तेव्हा त्या योग्य वाटल्या; मात्र विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर त्याच याद्यांवर शंका घेणे म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.” (Dada Bhuse Voter List Reply )
ते पुढे म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी, तरुण, शेतकरी आणि जनतेने विरोधकांना स्पष्ट संदेश दिला आहे. आगामी निवडणुकांमध्ये पराभव निश्चित असल्याचे जाणूनच विरोधक मतदार याद्यांच्या नावाखाली खोटा प्रचार करत आहेत.” (Dada Bhuse Voter List Reply )
मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले की, निवडणुका या निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पारदर्शक आणि निष्पक्षपणे पार पडतात, त्यामुळे मतदार याद्यांवर शंका घेणे म्हणजे लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्न निर्माण करणे होय.
नाशिक आणि जळगाव येथील सभांमध्येही शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी लोकशाहीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले होते. “मतदान प्रक्रिया ही भारताच्या संविधानाने दिलेली सर्वात मोठी शक्ती आहे. तिच्यावर विश्वास ठेवणे म्हणजेच लोकशाहीचा आदर आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. (Dada Bhuse Voter List Reply )
मंत्री भुसे म्हणाले, “ज्यांना जनता नाकारते त्यांनी ईव्हीएम किंवा मतदार याद्यांना दोष न देता आत्मपरीक्षण करावे. पराभवाचे कारण मतदार यादीत नव्हे, तर जनतेच्या मनात शोधावे. सत्ता येते-जाते, पण लोकशाहीचा पाया मजबूत राहिला पाहिजे.”
शेवटी त्यांनी जनतेला आवाहन करत सांगितले की, “खोट्या माहितीपासून सावध राहा आणि विकासावर आधारित राजकारणाला पाठिंबा द्या. राज्याचा सर्वांगीण विकास आणि शिक्षण क्षेत्राची उन्नती हेच आपले ध्येय आहे. विकास आणि लोकाभिमुख धोरणे घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत आणि जनता त्यालाच प्रतिसाद देईल.”
MHDU News : Vishal Bhadane
mhdunews #mhdusocial #DhuleNews #DadaBhuse #Politics #MaharashtraPolitics #Election2025 #VoterListIssue #SakriUpdates #MHDU


Fala, rapaziada! O cassinobetano tem uns jogos bem da hora e a plataforma é confiável. Já me diverti bastante por lá. Recomendo dar uma olhada pra quem curte um bom cassino online. Dá uma espiada aqui: cassinobetano
Thinking about downloading the okbet app… Anyone tried it? Hope it’s good! okbet app