Nashik Crime Mama Rajwade
नाशिक : शहरातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे! भाजपचे पदाधिकारी आणि शिवसेना (ठाकरे गट) चे माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे (Mama Rajwade) यांच्यावर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना पंचवटी परिसरातील न्यू पंजाब बार येथे घडली असून, बार चालकाकडून ५० हजार रुपयांचा हप्ता मागणी आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Nashik Crime Mama Rajwade)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मामा राजवाडे आणि त्यांच्या साथीदारांनी न्यू पंजाब बार चालकाला धमकी देत हप्त्याची मागणी केली. विरोध केल्यावर चालकाला मारहाण करण्यात आली तसेच विनयभंग व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आहे. या घटनेमुळे पंचवटी परिसरात व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणात एकूण 12 संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामध्ये — (Nashik Crime Mama Rajwade)
- मामा राजवाडे,
- राहुल बगमार,
- बाबासाहेब बढे,
- योगेश पवार,
- विशाल देशमुख,
- प्रकाश गवळी,
- संदीप पवार,
- लखन पवार,
- शरद पवार,
- प्रवीण कुमावत,
- चैतन्य कावरे,
- धीरज शर्मा —
यांचा समावेश आहे.
नाशिक गुन्हे शाखा 1 च्या पथकाने या प्रकरणात 5 ते 6 जणांना ताब्यात घेतले असून उर्वरित संशयित फरार आहेत. पोलिसांकडून फरारी आरोपींचा शोध सुरू आहे. (Nashik Crime Mama Rajwade)
याआधी मामा राजवाडे हे गंगापूर रोडवरील विसे मळा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात अटकेत असून सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्या प्रकरणात भाजप नेते सुनील बागूल (Sunil Bagul) यांचा पुतण्या अजय बागूल (Ajay Bagul) व पप्पू जाधवसह इतर आरोपींना अटक करण्यात आली होती.
या नव्या प्रकरणामुळे राजवाडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
MHDU News : Vishal Bhdane Nashik Crime Mama Rajwade
नाशिकमध्ये घडला धक्कादायक प्रकार; दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने केला आईचा खून
NashikCrime #MamaRajwade #BJP #ShivSenaUBT #NashikPolice #CrimeNews #NashikPolitics #MHDU #MHDUnews #mhdunews #mhdusocial


[…] […]
Finding a solid way to get into 188bet can be a hassle, but cachvao188bet makes it super easy. Finally, a consistent workaround! Here’s the link: cachvao188bet.