ST Bank Rada Mumbai
मुंबई : एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीदरम्यान बुधवारी (15 ऑक्टोबर) तुफान राडा झाला. दिवाळी बोनस वाटपाच्या चर्चेदरम्यान गुणरत्न सदावर्ते यांच्या गटातील संचालक आणि शिवसेना (शिंदे गट) नेते आनंदराव अडसूळ यांच्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र वाद झाला. हा वाद चांगलाच चिघळत गेला आणि अखेर थेट हाणामारीत परिवर्तित झाला.
या हाणामारीत चार ते पाच संचालक जखमी झाल्याची माहिती मिळाली असून, या प्रकरणी दोन्ही गटांनी नागपाडा पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. बैठकीदरम्यान अश्लील वर्तन, भ्रष्टाचार आणि अपमानास्पद भाषेच्या आरोपांमुळे वाद निर्माण झाल्याचे समजते.
बैठकीत सदावर्ते गट आणि अडसूळ गटातील सदस्य उपस्थित होते. शिवसेना गटाकडून आरोप करण्यात आला की, सदावर्ते गटातील काही सदस्यांनी त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांसोबत अश्लील वर्तन केले. महिलांचे कपडे फाडण्यात आले, मंगळसूत्र तोडण्यात आले आणि जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, असा गंभीर आरोप शिवसेना अडसूळ गटाने केला आहे.
ST Bank Rada Mumbai
दरम्यान, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “एसटी बँकेत सदावर्ते गटाने केलेल्या गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारामुळे कर्मचाऱ्यांचा विश्वास उडाला आहे. १२५ कर्मचाऱ्यांची भरती पैशांच्या देवाणघेवाणीतून करण्यात आली आहे. शिवाय, बँकेच्या १२ कोटींच्या सॉफ्टवेअरसाठी ५२ कोटी रुपये देण्यात आले — हेच सर्व भ्रष्टाचाराचे मूळ आहे. त्यामुळे सदावर्ते गटाने बाहेरील लोकांना बैठकीत आणून राडा घातला.”
या प्रकरणाचा तपास सध्या नागपाडा पोलिसांकडून सुरू असून, बैठकीतील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे एसटी बँकेतील अंतर्गत गटबाजी आणि सत्तासंघर्ष पुन्हा एकदा उघड झाला आहे.
MHDU News : Vishal Bhadane ST Bank Rada Mumbai
Dhule Khalane Danger Dumper Accident : धुळे-खलाणे बसस्थानकावर डंपरची धडक — 2 ठार, 2 गंभीर जखमी
#mumbai #shivsena #gunratnasadavarte #rada #stbank #st #bank #maharshtra #politics


[…] ST Bank Rada Mumbai : एसटी बँकेच्या बैठकीत सदावर्त… […]
[…] ST Bank Rada Mumbai : एसटी बँकेच्या बैठकीत सदावर्त… […]