4. Kalwan missing person Vithoba Pawar found inside his own homeकळवणमध्ये बेपत्ता विठोबा पवार घरातच सापडला; पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीचं कौतुक

Kalwan Missing Case

कळवण : नाशिक जिल्ह्यातील कळवण शहरात तीन ऑक्टोबर रोजी बेपत्ता झालेल्या विठोबा पवार या इसमाच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. पोलिसांच्या तपासातून धक्कादायक खुलासा झाला असून, ज्या व्यक्तीच्या बेपत्ताबाबत तक्रार दाखल करून आंदोलन चिघळले आणि दगडफेक झाली, तो इसम गावाबाहेर गेला नव्हता तर स्वतःच्या घरातच सापडला.

३ ऑक्टोबर रोजी विठोबा पवार हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेवरून आंदोलन पेटले, मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आणि पोलिसांनी मिसिंग आणि एट्रोसिटीचा गुन्हा नोंदवला. प्रकरण गंभीर होत असल्याने पोलिसांनी ५ विशेष पथके तयार करून शोध मोहीम राबवली.

पोलिसांनी केलेल्या खुलासाचा सविस्तर व्हिडिओ पाहा 👇

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता असे स्पष्ट झाले की विठोबा पवार गावाबाहेर गेला नव्हता. यानंतर पोलिसांनी सखोल चौकशीस सुरुवात केली. शेतशिवार, परिसर, तसेच घराघरांत तपासणी करण्यात आली. याचदरम्यान पोलिसांना विश्वसनीय माहिती मिळाली की, सदर व्यक्ती कुठेही बेपत्ता नसून आपल्या घरातच आहे.

पोलिसांनी झडती घेतली असता विठोबा पवार स्वतःच्या घरातच सापडला. ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी पुढील सखोल चौकशी सुरू केली असून, ही संपूर्ण घटना घडवून आणणारा सूत्रधार आणि मास्टरमाईंड कोण आहे हे शोधले जात आहे. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की चौकशीनंतर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, आंदोलन आणि दगडफेक प्रकरणात सहभागी असलेल्या काही समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, लवकरच कठोर कारवाई केली जाणार असल्याचे कळवण ग्रामीण पोलिस स्टेशनने जाहीर केले आहे.

📍 विशेष म्हणजे, या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेली वेगवान आणि अचूक कारवाई, तसेच सखोल तपासामुळे प्रकरणाचा निकाल लागल्याने पोलिसांच्या उत्तम कामगिरीचे समाजातून कौतुक केले जात आहे. 👮‍♂️👏

नाशिकच्या कळवणमध्ये पोलीस स्थानकावर दगडफेक; पोलिसांसह पत्रकार जखमी

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Kalwan Missing Case : 3 तारखेला बेपत्ता विठोबा पवार घरातच सापडला; पोलिसांची मोठी कारवाई आणि उत्तम कामगिरी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed