Nashik Police Transfer Shock :
नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे अखेर पोलीस विभागात मोठी हालचाल झाली आहे. पोलीस आयुक्तांनी थेट ॲक्शन मोडमध्ये जात एकाच आदेशात तब्बल 12 पोलीस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली (Nashik Police Transfer) केली असून यामध्ये 7 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. या निर्णयामुळे संपूर्ण पोलीस खात्यात खळबळ माजली आहे.
🔎 वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी ॲक्शन प्लॅन
गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण झपाट्याने वाढत होते. चोरी, घरफोडी, हाणामाऱ्या, सायबर गुन्हे अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर मंत्री दादा भुसे आणि भाजपच्या तिन्ही आमदारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतरच पोलिस विभागात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
🚨 तडकाफडकी बदलीत आलेल्या 12 अधिकाऱ्यांची यादी: (Nashik Police Transfer)
- पोलीस निरीक्षक मधुकर शिवाजी कड – अंबड पोलीस ठाणे
- पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग नवलसिंग राजपूत – गंगापूर पोलीस ठाणे
- पोलीस निरीक्षक मनोहर रामा कारंडे – अंबड पोलीस ठाणे
- पोलीस निरीक्षक प्रकाश आत्माराम अहिरे – भद्रकाली पोलीस ठाणे
- पोलीस निरीक्षक उमेश नानाजी पाटील – सायबर पोलीस ठाणे
- पोलीस निरीक्षक संतोष बबनराव नरुटे – मुंबईनाका पोलीस ठाणे
- पोलीस निरीक्षक रणजित पंडीत नलवडे – सातपूर पोलीस ठाणे
- पोलीस निरीक्षक संजय मारुती पिसे – आडगांव पोलीस ठाणे
- पोलीस निरीक्षक विश्वास रोहिदास पाटील – एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकी
- पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे – इंदिरानगर पोलीस ठाणे
- पोलीस निरीक्षक तुषार मुरलीधर अढावु – शहर वाहतूक शाखा, युनिट क्र. 1
- पोलीस निरीक्षक रियाज ऐनुद्दीन शेख – सातपूर युनिट, शहर वाहतूक शाखा
📍 राजकीय दबाव की कडक शिस्त?
या मोठ्या बदलीनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काही तज्ज्ञांच्या मते ही बदली पूर्णपणे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घेतलेली ॲक्शन आहे, तर काहींच्या मते आमदारांच्या भेटीमुळे पोलीस विभागावर राजकीय दबाव निर्माण झाला होता. मात्र, एक गोष्ट स्पष्ट आहे – नाशिकमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस आता अधिक कडक पावले उचलणार आहेत.
Nashik Roads Pothole-Free Promise in Air? – नाशिककरांचा संताप रस्त्यावर


[…] […]
[…] […]