Nashik Politics
नाशिक शहरात अलीकडच्या काळात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे आता राजकीय (Nashik Politics) तापमान चांगलेच चढले आहे. भाजपच्या दोन माजी नगरसेवकांना खुनाच्या प्रयत्नात अटक झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून थेट मित्रपक्ष भाजपलाच कोंडीत पकडले आहे.
शालेय शिक्षणमंत्री आणि शिवसेना नेते दादा भुसे यांनी पोलिस आयुक्तांच्या दालनात बैठक घेऊन शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्याचे थेट निर्देश दिले. विशेष म्हणजे, भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करत असताना, दादा भुसे यांनी कायदा सुव्यवस्थेवरून बैठक घेत भाजपवर राजकीय कुरघोडी साधली.
Nashik Politics
शहरात अलीकडेच कोयता गँगची दहशत आणि ‘एमडी‘ सारख्या अंमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. याच काळात भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे आणि जगदीश पाटील यांना खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपात अटक करण्यात आली, ज्यामुळे भाजपच आरोपीच्या पिंजऱ्यात सापडल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिक गंभीर ठरत असून, नागरिकांचा पोलिसांवर संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे, शिंदे गटाने “गुन्हेगारीविरोधी पक्ष” अशी आपली भूमिका दाखवून भाजपपासून वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
महाजन पूरस्थितीची पाहणी करत असताना दादा भुसे यांनी घेतलेली बैठक हे या राजकीय संघर्षाचे प्रतीक मानले जात आहे. भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत आता गुन्हेगारीवरून सुरू झालेला हा संघर्ष महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या फाटाफुटीचे संकेत देतो आहे. दोन्ही पक्ष आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढवणार असल्याने, महायुतीतच थंड युद्ध पेटण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
नवीन ताज्या घडामोडी 👇: Nashik Politics : गुन्हेगारीमुळे भाजप बचावात, शिंदेसेनेची चाल मात्र ‘धडाकेबाज’,2 मित्रपक्षांतच वाढला संघर्ष!Nashik News: Viral Reel Turns Tables as Police Parade Gangsters on Knees in Public


[…] Nashik Crime Politics: गुन्हेगारीवरून शिंदेसेनेची … […]