Congress Protest Against CEC Gyanesh Kumar in Nashik
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रपतींच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली.
नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष निलेश (बबलू) खैरे, नाशिक जिल्हा उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे आणि दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. प्रदेश उपाध्यक्ष शरदराव आहेर आणि प्रदेश सचिव प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले.
निवडणूक आयोगातील मतभेदांच्या वृत्तावरून काँग्रेस आक्रमक _ Congress Protest Against CEC Gyanesh Kumar in Nashik
निवडणूक आयोगाच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) प्रक्रियेबाबत निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत किमान 14 वेळा विविध निर्णयांवर औपचारिक आक्षेप नोंदवल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मतदार नोंदणी, नावे वगळणे तसेच मतदार यादीशी संबंधित डेटा हाताळणीसह विविध विषयांवर हे आक्षेप असल्याचे संबंधित वृत्तात म्हटले आहे.
या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्तांनी इतर आयुक्तांना विश्वासात न घेता काही निर्णय घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी SIRसह आयोगाचे निर्णय तिन्ही आयुक्तांच्या मंजुरीने घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
13 कोटी मतदारांच्या मुद्द्यावर काँग्रेसचे प्रश्न _ Congress Protest Against CEC Gyanesh Kumar in Nashik
SIR प्रक्रियेदरम्यान देशभरातील मसुदा मतदार याद्यांमधून 13 कोटींपेक्षा अधिक नावे वगळण्यात आल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने या प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या मतदारांबाबत पारदर्शक चौकशी व्हावी आणि पात्र मतदारांचा मतदानाचा अधिकार अबाधित राहावा, अशी मागणी पक्षाने केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या प्रकरणावर निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली असून ‘वोट चोरी’चा आरोप केला आहे. हे आरोप राजकीय स्वरूपाचे असून निवडणूक आयोगाने त्याच्या प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण देताना आयोगातील मतभिन्नता व लेखी सूचना या संस्थात्मक प्रक्रियेचा भाग असल्याची भूमिका मांडली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी _ Congress Protest Against CEC Gyanesh Kumar in Nashik
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केली. त्यानंतर शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन सादर केले.
या निवेदनावर शहराध्यक्ष निलेश (बबलू) खैरे, जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे, भारत टाकेकर, महिला अध्यक्षा स्वाती जाधव, नगरसेविका नाजिया अत्तार, कुसुम चव्हाण, रईस शेख, ज्ञानेश्वर काळे, युवक काँग्रेस अध्यक्ष गौरव पानगव्हाणे, जयेश पोकळे, उद्धव पवार, अरुण दोंदे, संपत वक्ते, सुदेश मोरे, संदीप वाघ, विक्रांत वावरे, दत्तात्रय सोनवणे, मंगेश लहामगे, अभिजित राऊत, किरण जाधव, जाकीर अत्तार, समीर देशमुख यांच्यासह काँग्रेसच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या प्रकरणामुळे SIR प्रक्रिया, मतदार याद्यांचे पुनरीक्षण आणि निवडणूक आयोगातील निर्णयप्रक्रियेवरून सुरू असलेला राजकीय वाद आणखी तीव्र झाला आहे.
प्रतिनिधी : सोपान रणपिसे _ Congress Protest Against CEC Gyanesh Kumar in Nashik


I’ve been trying a few different platforms lately but this one really stands out. The interface is super smooth and the payouts are legit. Definitely worth checking out bdi444
Finally found a platform that doesn’t lag during peak hours. The bonuses are actually fair and easy to claim. betbuss is my new go-to place.