Maharashtra Drought Affected Students Exam Fee Waiver 2027
राज्यातील दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांमधील इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता ऑनलाइन आवेदनपत्रे भरून घेण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत.
मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर विशेष बाब म्हणून विविध सवलती लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीचाही समावेश आहे.
या शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षांसाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता ऑनलाइन आवेदनपत्रे भरून घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. _ Maharashtra Drought Affected Students Exam Fee Waiver 2027
या संदर्भातील पुढील सविस्तर सूचना राज्य मंडळाकडून स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार आहेत. दरम्यान, सर्व विभागीय मंडळांनी आपल्या कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना याबाबत तात्काळ सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, या आदेशानुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे तातडीने सादर करण्याचे निर्देशही सर्व विभागीय मंडळांना देण्यात आले आहेत. _ Maharashtra Drought Affected Students Exam Fee Waiver 2027
या निर्णयामुळे दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करणाऱ्या २६५ तालुक्यांतील इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या माध्यमातून आर्थिक दिलासा मिळणार आहे.
महादूत जनबिंदू प्रतिनिधी : दीपक सरोदे _ Maharashtra Drought Affected Students Exam Fee Waiver 2027


Such a hidden gem! I wasn’t expecting much but this site exceeded all my expectations. Huge thanks to bd7c7770 for the awesome service.
Finally found a place that handles payouts without any hassle. The support team is also very helpful if you run into any issues. Highly recommend bl888bet to everyone
I really appreciate the variety of betting options available here. It keeps things exciting. Highly recommend phhannph to all my mates.
I really enjoy the community vibe here. Everyone is friendly and the rewards are actually attainable. Big thanks to vn168fgame for the great time.