Nashik Sinhastha Kumbh Branding Brajesh Singh
नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकची धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनविषयक ओळख देशासह जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी व्यापक माध्यम आराखडा तयार करावा, असे निर्देश माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिले.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या सभागृहात माध्यम आराखड्याच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक डॉ. किशोर गांगुर्डे, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, उपसंचालक डॉ. किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डिजिटल आणि सोशल मीडियावर विशेष भर _ Nashik Sinhastha Kumbh Branding Brajesh Singh
ब्रिजेश सिंह यांनी सांगितले की, १२ वर्षांनंतर नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होत आहे. त्यामुळे या सोहळ्याचे जागतिक स्तरावर प्रभावी ब्रँडिंग करण्यासाठी पारंपरिक माध्यमांसोबतच डिजिटल मीडिया, सोशल मीडिया, दृक्-श्राव्य माध्यमे तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांचा समन्वयित वापर करणे आवश्यक आहे.
कुंभमेळ्याची धार्मिक परंपरा, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा, गोदावरी नदी तसेच प्रमुख तीर्थस्थळांची माहिती देश-विदेशातील भाविक आणि पर्यटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी नियोजनबद्ध प्रसिद्धी मोहीम राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
नाशिकच्या पर्यटनाला मिळणार नवी ओळख _ Nashik Sinhastha Kumbh Branding Brajesh Singh
कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक-त्र्यंबकेश्वरची स्वतंत्र पर्यटन ओळख निर्माण करण्यावरही भर देण्यात आला. अध्यात्मिक स्थळे, स्थानिक कला-संस्कृती, खाद्यपरंपरा, वारसा स्थळे आणि पर्यटनस्थळांचे प्रभावी सादरीकरण विविध माध्यमांतून करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
यासाठी विविध माध्यमांसाठी स्वतंत्र आशय निर्मिती, प्रचार साहित्य आणि सोशल मीडिया मोहिमांचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
विकासकामांची माहिती आणि अफवांवर तातडीने खंडन _
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यात सुरू असलेल्या दीर्घकालीन पायाभूत सुविधा आणि विकासकामांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावरही भर देण्यात आला.
कुंभमेळ्याबाबत चुकीची माहिती किंवा अफवा पसरल्यास त्याचे तातडीने खंडन करून अधिकृत माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी, अशा सूचनाही देण्यात आल्या.
कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती बैठकीत दिली.
रामकुंड परिसराची पाहणी
बैठकीनंतर महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी रामकुंड परिसराला भेट देऊन पाहणी केली. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने भाविकांना उपलब्ध होणाऱ्या सुविधा, प्रमुख स्थळांचे माध्यमीय सादरीकरण आणि प्रसिद्धीच्या दृष्टीने आवश्यक बाबींची त्यांनी माहिती घेतली.
यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महादूत जनबिंदू प्रतिनिधी : दीपक सरोदे __ Nashik Sinhastha Kumbh Branding Brajesh Singh


Quick deposits and even quicker withdrawals. That is all I care about in a gaming site. Keep up the good work ppc88login.
I love that I can play anytime and anywhere. The 24/7 availability of inyono247 is exactly what I needed.
Super reliable platform. I’ve tried many others but this one feels the most secure and honest. The rewards are awesome too. vnvic88
Such a friendly community and the rewards are actually generous. Loving my time on jililoveapp