Godi Budruk Zp School Tribal Art Museumघोडी बु. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी मातीपासून साकारलेल्या पारंपरिक बोहाडा मुखवट्यांसह विविध कलाकृती.

Godi Budruk Zp School Tribal Art Museum

सुरगाणा : शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत स्थानिक कला आणि संस्कृतीचे जतन करण्याचा प्रेरणादायी उपक्रम सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, घोडी बु. येथे राबविण्यात आला आहे. शिक्षक राऊत सर यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना मातीपासून विविध कलाकृती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून, या कलाकृतींचे शाळेतच लघु कला-संग्रहालय उभारण्यात आले आहे.

पिंपळसोंड येथे एमटीडीसीच्या प्रशिक्षण उपक्रमात सहभागी होत राऊत सरांनी मातीपासून कलाकृती तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले. हे कौशल्य केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मातीपासून पारंपरिक बोहाडा मुखवटे, विविध पक्षी, प्राणी आणि आकर्षक कलाकृती साकारल्या.

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनाशक्तीचा वापर करून तयार केलेल्या या कलाकृती शाळेत प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील पारंपरिक कला, आदिवासी संस्कृती आणि हस्तकलेची ओळख प्रत्यक्ष कृतीतून होत आहे.

“शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान नको, तर आपल्या मातीतली कला आणि संस्कृतीही विद्यार्थ्यांना शिकवली पाहिजे,” या विचारातून राऊत सरांनी हा उपक्रम राबविला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळत असून, त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळत आहे. _ Godi Budruk Zp School Tribal Art Museum

विशेष म्हणजे, शाळेत उभारण्यात आलेले हे लघु कला-संग्रहालय विद्यार्थ्यांसाठी शिकण्याचा एक वेगळा अनुभव ठरत आहे. स्थानिक आदिवासी कला आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक दृष्टी, कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम या उपक्रमातून होत आहे.

शाळा ही केवळ पुस्तकी ज्ञान देणारी संस्था न राहता कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेचे केंद्र बनावी, या दृष्टिकोनातून राबविण्यात आलेल्या राऊत सरांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

प्रतिनिधी : लक्ष्मण बागुल _ Godi Budruk Zp School Tribal Art Museum

Nashikroad Woman Blackmail Case : नाशिकरोडमध्ये महिलेला गुंगीकारक औषध देऊन अत्याचाराचा आरोप; फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *