Old Pension Teachers Silent March Nashik

Old Pension Teachers Silent March Nashik


नाशिकमध्येही जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मूक मोर्चाद्वारे शासनाचे लक्ष वेधले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

    राज्यातील सुमारे २६ हजार पेन्शनपीडित कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत २५ सप्टेंबरपर्यंत स्पष्ट शासन आदेश काढावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. _ Old Pension Teachers Silent March Nashik

    शासनाकडून निर्धारित मुदतीत निर्णय न झाल्यास २८ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल. त्यानंतर २ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

    दरम्यान, आगामी विधानपरिषद निवडणुकीत शिक्षक, कर्मचारी, पदवीधर, विद्यार्थी आणि पालकांच्या माध्यमातून मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका संघटनेने निवेदनातून जाहीर केली आहे.

    जुन्या पेन्शन योजनेचा हक्क असल्याचा दावा करत शासनाने या प्रश्नावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली.

    मूक मोर्चात योगेश पाटील, संजय देसले, दिगंबर नारायणे, सचिन पगार, मोहन चकोर, प्रदीप सांगळे, दत्तात्रय सांगळे, जिभाऊ शिंदे, राजेंद्र देवरे, संपत कदम, शेख साजिद, सुनील खैरनार, महाजन यू. आर., सचिन शिरसाठ, योगेश कांगणे, गोसावी सर, शेख अनशारी यांच्यासह जिल्हाभरातील हजारो पेन्शनपीडित बांधव सहभागी झाले होते.

    – प्रतिनिधी : दीपक सरोदे _ Old Pension Teachers Silent March Nashik

    Nashik Agriculture Department Action : नाशिक जिल्ह्यातील आणखी 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित; आतापर्यंत 154 परवान्यांवर कारवाई

    Avatar photo

    By Vishal Bhadane

    Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

    One thought on “Old Pension Teachers Silent March Nashik : जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा मूक मोर्चा; 25 सप्टेंबरपर्यंत निर्णयाची मागणी”

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *