Nashik Ration Card Verification
नाशिक : जिल्ह्यात रेशनकार्डधारकांची माहिती अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या पडताळणी मोहिमेत तब्बल 29 हजार 773 रेशनकार्डे वगळण्यात आली आहेत. मृत लाभार्थी, दुबार नोंद, स्थलांतर, अपात्रता तसेच पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांची नावे कमी करण्यात आली आहेत.
शासकीय अन्नधान्य योजनांचा लाभ केवळ पात्र लाभार्थ्यांनाच मिळावा आणि रेशनकार्डमधील अपात्र व दुबार नोंदी कमी व्हाव्यात, यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. _ Nashik Ration Card Verification
वगळण्यात आलेल्या रेशनकार्डांमध्ये प्राधान्य कुटुंबातील 18 हजार 527, अंत्योदय योजनेतील 5 हजार 502, बिगरप्राधान्य गटातील 3 हजार 442 आणि दारिद्र्यरेषेवरील 2 हजार 302 कार्डांचा समावेश आहे.
दरम्यान, या प्रक्रियेत पात्र लाभार्थ्यांना योजनेत समाविष्ट करण्यावरही भर देण्यात आला आहे. जिल्ह्यात 25 हजार 753 नवीन लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये प्राधान्य कुटुंबातील 19 हजार 39, अंत्योदय योजनेतील 4 हजार 535, बिगरप्राधान्य गटातील 1 हजार 758 आणि दारिद्र्यरेषेवरील 421 लाभार्थ्यांचा समावेश आहे. _ Nashik Ration Card Verification
तसेच मे 2026 ते 16 ऑगस्ट 2026 या कालावधीत जिल्ह्यात 16 हजार 405 नवीन रेशनकार्डे तयार करण्यात आली आहेत.
मृत लाभार्थी, दुबार नोंदी, स्थलांतरित लाभार्थी आणि अपात्र व्यक्तींची माहिती अद्ययावत करून पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया पुढेही सुरू राहणार आहे.
त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या रेशनकार्डवरील कुटुंबातील सदस्यांची नावे, कार्डाची स्थिती आणि लाभाची पात्रता तपासून पाहणे महत्त्वाचे आहे.
या संदर्भातील माहिती जिल्हा धान्य पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी दिली.
महादूत जनबिंदू | प्रतिनिधी – दीपक सरोदे _ Nashik Ration Card Verification

