Dhule youth entrepreneur Shubham Sheth Singhvi accident newsधुळेकरांचा लाडका शुभम “शेठ” सिंघवी यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू

धुळे :
धुळे शहरातील (Royal Mens Wear) युवा उद्योजक, रील स्टार आणि सर्वांचा लाडका शुभम “शेठ” सिंघवी यांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे. गणपती विसर्जन करून परत येत असताना कुंडाणे फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे शुभम यांचा जागीच मृत्यू झाला.

शुभम सिंघवी हे धुळे शहरातील सहजीवन नगर येथील रहिवासी होते. शहरातील मोठ्या गणेश मंडळांचे विसर्जन उशिरापर्यंत तापी नदीपात्रात होत असते. त्याच निमित्ताने शुभम सकाळी दुचाकीने तापी नदीपात्राजवळ गेले होते. मात्र परत येत असताना हा अपघात झाला.

👉 “👉 पूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी Play करा”

शुभम हे केवळ एक यशस्वी उद्योजकच नव्हते, तर गणपती बाप्पावर अपार प्रेम करणारे, आई–वडिलांचे लाडके, मित्रपरिवाराचे जिवलग आणि आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. खूप कमी वयात त्यांनी व्यवसायातून आणि सोशल मीडियातून मोठं नाव कमावलं. “शुभम शेठ” या नावाने त्यांची ओळख धुळेकरांच्या मनात घट्ट रुजली होती.

त्यांच्या अचानक जाण्याने धुळे शहर शोककळेत बुडाले आहे. सोशल मीडियावर शुभमसाठी श्रद्धांजली संदेशांचा वर्षाव होत असून, मित्रपरिवार व परिचितांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

ते म्हणतात ना :
“वेळ आली आणि काळ गेला,
जो आवडे सगळ्यांना, तोसी आवडे देवाला…”

शुभमच्या निधनामुळे धुळे शहराला मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed