Nashik ACB Bribery Case PSI Harshvardhan Bahir Arrest
नाशिक | MHDU News | प्रतिनिधी : कुणाल दानेच
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एका गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी तसेच अटक टाळून मदत करण्याच्या मोबदल्यात ४ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तत्कालीन पोलिस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक हर्षवर्धन दिलीप बहीर (सध्या श्रीरामपूर शहर पोलिस ठाणे, जि. अहिल्यानगर), तसेच सुनील शिवाजी बोराडे आणि जगदीश तुकाराम बोराडे (दोघेही रा. पाटोदा, ता. येवला) यांचा समावेश आहे.
एसीबीच्या माहितीनुसार, पाटोदा येथील एका गुन्ह्यात तक्रारदाराच्या भावाला आरोपी न करण्यासाठी व त्याला अटक होऊ नये यासाठी मदत करण्याच्या बदल्यात खासगी मध्यस्थामार्फत ४ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता लाचेच्या मागणीची पुष्टी झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. पुढील चर्चेनंतर आरोपींनी लाचेच्या रकमेत तडजोड करून २ लाख ५० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचेही उघड झाले.
तपासादरम्यान, ९ एप्रिल २०२६ रोजी या व्यवहाराचा भाग म्हणून तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर यांच्यासाठी ५० हजार रुपये एका मध्यस्थाने फोन-पे (PhonePe) द्वारे स्वीकारल्याचे पुराव्यात समोर आले आहे. (Nashik ACB Bribery Case PSI Harshvardhan Bahir Arrest)
उपलब्ध पुरावे, पडताळणी आणि सखोल चौकशीनंतर सोमवार (२७ जुलै) रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येवला तालुका पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ तसेच भारतीय न्याय संहितेतील (BNS) संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर एसीबीने या प्रकरणात तिघांना अटक केली असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करीत आहेत.
Nashik ACB Bribery Case PSI Harshvardhan Bahir Arrest
ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीच्या आमिषाने नाशिकच्या तरुणाची ₹14.64 लाखांची सायबर फसवणूक


[…] […]
I’ve tried a few sites lately but this one really stands out for its smooth interface. Highly recommend checking out 393betlink if you want a hassle-free experience.