MJPJAY Scam SIT Investigation Nashik२२ ते २६ जुलैदरम्यान होणाऱ्या महसूल समाधान शिबिरांसाठी जळगाव प्रशासनाची तयारी पूर्ण.

MJPJAY Scam SIT Investigation Nashik

मुंबई | MHDU News प्रतिनिधी : सुरेश पाटील

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यात झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा आज विधिमंडळातील आढावा बैठकीत केली.

नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली या विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात येणार असून, विविध विभागांतील तज्ज्ञांचा त्यात समावेश असेल. SIT चा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अपहार झालेल्या निधीची वसुलीही केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

राज्य आरोग्य हमी सोसायटीने २०२४ ते २०२६ या कालावधीत केलेल्या तपासणीत राज्यभरात सुमारे १६ हजार संशयित दावे आणि शस्त्रक्रिया आढळून आल्या आहेत. यापैकी तब्बल ९,५०० प्रकरणे नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या प्रकरणी नाशिकमधील पाच रुग्णालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, गरीब व गरजू नागरिकांना पारदर्शक आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. जनआरोग्य योजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नाही.

फसवणूक रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा अॅनालिटिक्स, सायबर तपास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक वापर केला जाणार आहे. संशयास्पद सुमारे १३ लाख संभाव्य फसवणूक प्रकरणांची अत्याधुनिक विश्लेषण प्रणालीद्वारे छाननी केली जाणार असून, महाराष्ट्र सायबर पोलिसांचाही या तपासात सक्रिय सहभाग राहणार आहे.

याशिवाय मोठ्या रकमेच्या उपचार दाव्यांचे विशेष लेखापरीक्षण (Audit), संशयित प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिट, प्रत्येक जिल्ह्यात फसवणूक प्रतिबंधक यंत्रणा आणि रिअल-टाइम मॉनिटरिंगसाठी अत्याधुनिक डॅशबोर्ड प्रणाली उभारण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे.

या बैठकीस महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार डॉ. राहुल आहेर तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची पारदर्शकता, विश्वासार्हता आणि उत्तरदायित्व अधिक मजबूत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

MJPJAY Scam SIT Investigation Nashik

 नाशिक हादरलं! आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातील अल्पवयीन मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

2 thoughts on “MJPJAY Scam SIT Investigation Nashik : नाशिकमधील जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी SIT स्थापन; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय”
  1. [2764]Laju99 Login Link | Trusted Online Slot Malaysia,Access laju99 login link for an online slot trusted malaysia experience. Easy touch n go casino deposit and laju99 apk download available. Join today. visit: laju99

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *