Nashik Ring Road Central Approvalनाशिक रिंगरोडला केंद्राची मंजुरी! सिंहस्थपूर्वी वाहतुकीत मोठा बदल घडणार. 🚧

Nashik Ring Road Central Approval

नाशिक (Nashik) : सिंहस्थ-कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराभोवती उभारण्यात येणाऱ्या सिंहस्थ परिक्रमा मार्गाला (रिंगरोड) अखेर केंद्र सरकारचीही मंजुरी मिळाली आहे. राज्य सरकारने यापूर्वीच भूसंपादनासाठी निधी मंजूर केला होता. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या रस्ते विकास मंत्रालयाच्या संरेखन मंजुरी समितीने ४७.९० किलोमीटरच्या प्रस्तावित रिंगरोडला हिरवा कंदील दिला आहे. (Nashik Ring Road Central Approval)

या रिंगरोड प्रकल्पासाठी तब्बल ₹५,८०५.२० कोटी निधी मंजूर करण्यात आला असून हा मार्ग आडगाव ट्रक टर्मिनसपासून सुरू होऊन रायगड नगर येथे समाप्त होणार आहे. मात्र, देवळाली कँप परिसरातील संरक्षण विभागाचा भाग तसेच एकलहरे औष्णिक वीज केंद्र संवेदनशील ठिकाणे असल्याने हा भाग समाविष्ट करण्यात आला नाही. त्यामुळे राज्य सरकारने सुचवलेल्या ७७ किमी पैकी ४७.९० किमी मार्गालाच मंजुरी देण्यात आली आहे.

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पूर्वी हा रिंगरोड पूर्ण करण्याचा मानस असून अंमलबजावणीची जबाबदारी महाराष्ट्र पायाभूत विकास महामंडळाला (MSRDC) सोपवण्यात आली आहे. (Nashik Ring Road Central Approval)

पूर्वी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने खासगी कंपनीमार्फत डीपीआर तयार केला होता. मात्र, त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारने हा संपूर्ण प्रकल्प संयुक्तपणे उभारण्याचा निर्णय घेतला. पर्यावरण मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळताच हा प्रस्ताव वेगाने पुढे सरकला आहे. राज्यस्तरावरून सादर केलेल्या पाच पर्यायी संरेखनपैकी ४७.९० किमी मार्गाला अंतिम मान्यता मिळाली आहे. (Nashik Ring Road Central Approval)

हा रिंगरोड नाशिक–तवा–वाढवण महामार्गाला गोंदेदुमाला येथे जोडणार असून त्यामुळे वाढवण बंदर व समृद्धी महामार्गाकडे वाहतुकीची सुलभता निर्माण होणार आहे. तसेच आडगाव ट्रक टर्मिनल येथे हा मार्ग नाशिक–चेन्नई व नाशिक–अक्कलकोट महामार्गाशी जोडला जाणार आहे.

प्रकल्पासाठी नाशिक शहराभोवती १८ गावांमधील ३०५ हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. यात २७ घरे हलविण्यात येणार असून २९ ठिकाणी भुयारी मार्ग (अंडरपास) उभारले जातील.

संरेखन मंजुरी समितीने महाराष्ट्र सरकार व एमएसआयडीसीला तात्काळ भूसंपादन व टेंडर प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. पाथर्डी–आडगाव या उर्वरित भागाला देखील लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

दोन दशकांपासून प्रलंबित असलेला हा रिंगरोड प्रकल्प प्रत्यक्षात मार्गी लागण्याच्या दिशेने मोठी गती मिळाली आहे.

MHDU News : Vishal Bhadane Nashik Ring Road Central Approval

Nashik Ring Road Central Approval
नाशिक रिंगरोडला केंद्राची मंजुरी! सिंहस्थपूर्वी वाहतुकीत मोठा बदल घडणार. 🚧

नाशिक गुन्हे: 2700 गुंतवणूकदारांना गंडा घालून 9 वर्षे फरार असलेला आरोपी अटकेत

Nashik Ring Road Central Approval

Nashik: The long-pending Simhastha Ring Road project around Nashik city has finally received approval from the Central Government. While the State Government had already sanctioned funds for land acquisition, the Alignment Approval Committee of the Ministry of Road Transport and Highways has now given the green signal to a 47.90 km stretch of the proposed ring road.

A total of ₹5,805.20 crore has been approved for the project. The ring road will start from the Adgaon truck terminus and end at Raigad Nagar. The sensitive areas of Deolali Cantonment and the Eklahare Thermal Power Plant have been excluded from the alignment, which is why only 47.90 km of the originally proposed 77 km route has been approved.

The project aims to be completed before the 2027 Simhastha Kumbh Mela, and the implementation responsibility has been assigned to the Maharashtra State Road Development Corporation (MSRDC). The ring road will connect Nashik–Tawa–Vadhavan Highway at Gondedumala and link with the Nashik–Chennai and Nashik–Akkalkot highways near the Adgaon terminal.

For this project, 305 hectares of land across 18 villages will be acquired. A total of 27 houses will be removed, and 29 underpasses will be constructed. Approval for the remaining Pathardi–Adgaon stretch is expected soon.

After nearly two decades of delay, the Nashik Ring Road project is finally moving toward reality.

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

4 thoughts on “Nashik Ring Road Central Approval : नाशिकच्या रिंगरोडला केंद्र सरकारची मंजुरी; ‘हा’ संवेदनशील भाग वगळला”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *