Ujjainwal Gang Nashik Arrest
नाशिक | उज्जैनवाल टोळीतील आरोपी राहुल उज्जैनवाल अखेर उपनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
फर्नांडिसवाडी येथील फायरिंग प्रकरणानंतर हा आरोपी तब्बल चार महिन्यांपासून फरार होता.
मिळालेल्या माहितीनुसार, १० जुलै रोजी रात्री राहुल उज्जैनवालने हफ्ते वसुली, जागा बळकावणे आणि गावठी पिस्तुलाचा वापर करून गोळीबार करत परिसरात दहशत निर्माण केली होती. या घटनेनंतर तो पसार झाला होता. त्या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Ujjainwal Gang Nashik Arrest)
दरम्यान, ३० ऑक्टोबरच्या मध्यरात्री, आरोपी नाशिक रोड परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकाचे अधिकारी गौरव गवळी यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपी पडून जात असताना गौरव गवळी व जयंत शिंदे यांनी त्याचा गल्लीबोळातून पाठलाग करत त्याला पकडले.
झडती घेतली असता आरोपीच्या कमरेला गावठी पिस्तुल आणि ५ जिवंत काडतुसे असा एकूण ₹५५,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Ujjainwal Gang Nashik Arrest)
अशा प्रकारे उज्जैनवाल टोळी नेहमी शस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याचे प्रकार घडवत असतात, तरीही पोलिस पथकाने आपल्या जीवाची पर्वा न करता तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
MHDU News : Vishal Bhadane Ujjainwal Gang Nashik Arrest


[…] […]
Multi Bet seems like a solid choice for combo bets. I’ll check it out, maybe I will increase my payout with the risk. Let’s win big! multi bet
Heard dailyjilicasino was popping, so I checked it out Gotta say, it’s a vibe Lots to do and easy to get into I’m definitely coming back dailyjilicasino