Traffic Police Mobile Ban on Private Mobile Photos
🚨 महाराष्ट्र वाहतूक विभागाचा कडक निर्णय!
आता वाहतूक पोलिसांनी ई-चलान कारवाईदरम्यान खाजगी मोबाईल (Traffic Police Mobile Ban) फोन वापरून वाहनांचे फोटो काढणे किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे पूर्णपणे बंद केले आहे. नियम मोडल्यास संबंधित अधिकाऱ्यावर थेट शिस्तभंगात्मक कारवाई आणि निलंबनाची शक्यता निर्माण होईल.
📍 काय आहे आदेश:
अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रविण साळुंके यांनी राज्यातील सर्व वाहतूक पोलिसांसाठी नवे आदेश जारी केले आहेत. यात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, ई-चलान करताना फक्त अधिकृत शासकीय उपकरणांचाच वापर केला जावा, खाजगी मोबाईलचा वापर पूर्णपणे प्रतिबंधित आहे.
📍 परिवहन मंत्र्यांची नाराजी:
विधान भवनात झालेल्या एका बैठकीत वाहतूक संघटनांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रार केली होती की, अनेक पोलीस अधिकारी खाजगी मोबाईलने मोठ्या प्रमाणात फोटो काढून ते नंतर सोयीने ई-चलान प्रणालीमध्ये अपलोड करतात आणि चुकीच्या पद्धतीने चलान जारी करतात.
या तक्रारीनंतर मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.
📍 मनमानीला आळा:
अनेक वेळा असे दिसून आले आहे की काही अधिकारी वास्तविक वेळेऐवजी नंतर फोटो अपलोड करून चुकीची कारवाई करतात. त्यामुळे, आता अशा प्रकारे वागणाऱ्या पोलिसांविरुद्ध कडक शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
📍 राज्यभर अंमलबजावणी:
हे आदेश मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि इतर सर्व शहरांतील पोलीस आयुक्त, अधीक्षक आणि महामार्ग पोलीस ठाण्यांना पाठवण्यात आले आहेत.
✅ थोडक्यात: आता वाहतूक पोलिसांनी खाजगी मोबाईल वापरला तर थेट कारवाई होणार, आणि चुकीच्या चलान पद्धतींवर पूर्णविराम मिळणार आहे!
Traffic Police Mobile Ban

Gautami Patil Gets Clean Chit in Car Accident Case – गौतमी पाटील यांना अपघात प्रकरणात दिलासा!

