Tapovan Tree Cutting NGT Stay Order
राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) नाशिकमधील तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीवर मोठा निर्णय देत १५ जानेवारी २०२६ पर्यंत स्थगिती दिली आहे. न्यायिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही वृक्षतोड थांबवावी, असे स्पष्ट निर्देश लवादाने दिले आहेत. या आदेशामुळे पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
✦ काय आहे याचिकाकर्त्यांचे म्हणणे?
वकील श्रीराम पिंगळे यांनी दाखल केलेल्या याचिकेत वृक्षतोडीपूर्वी आवश्यक असलेल्या न्यायिक प्रक्रिया पूर्ण झालेल्या नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यांनी सांगितले की हा फक्त अंतरिम आदेश आहे आणि अंतिम निर्णय लवकरच होणार आहे.
याचिकाकर्त्यांनी पुढील मुद्दे मांडले: (Tapovan Tree Cutting NGT Stay Order)
वृक्षतोडीपूर्वीची कायदेशीर प्रक्रिया अपूर्ण.
एकदा झाडे तोडल्यावर पुनर्लागवड यशस्वी होत नाही.
यापूर्वी उभारलेले प्रदर्शन केंद्र निष्प्रयोज्य ठरले.
साधूग्राम प्रकल्प आणि वृक्षतोडीला मोठ्या प्रमाणात विरोध.
✦ साधूग्राम प्रकल्प आणि वाद (Tapovan Tree Cutting NGT Stay Order)
२०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरात १,१५० एकर क्षेत्रावर साधू-महंतांसाठी साधूग्राम उभारण्याची महानगरपालिकेची योजना आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १८०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव होता.
✦ कोणकोण करत आहेत विरोध? (Tapovan Tree Cutting NGT Stay Order)
अभिनेते सयाजी शिंदे
शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
मनसे आणि ठाकरे गटाकडून तपोवन परिसरात मोठे आंदोलन छेडण्यात आले होते. ‘एकही झाड तोडू देणार नाही’ असा इशारा देण्यात आला होता.
✦ १५ हजार वृक्षलागवडीची तयारी (Tapovan Tree Cutting NGT Stay Order)
वृक्षतोडीला विरोध होत असताना राज्य सरकारने नाशिकमध्ये १५,००० देशी वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
झाडांचे प्रकार: वड, पिंपळ, निंब, जांभूळ, आंबा
उंची: साधारण १५ फूट
व्यवस्था: ठिबक सिंचन, जैविक खतांचा वापर
प्रारंभ: मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सोमवारी मोहीमेची सुरुवात
NGT च्या या निर्णयामुळे साधूग्राम प्रकल्पाच्या कामाला १५ जानेवारीपर्यंत ब्रेक बसला आहे. पुढील सुनावणीत लवाद काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
MHDU News : Vishal Bhadane

नाशिकच्या रिंगरोडला केंद्र सरकारची मंजुरी; ‘हा’ संवेदनशील भाग वगळला
#Tapovan #Savetree #Ngt


[…] तपोवन वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवा… […]
[…] तपोवन वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवा… […]
Tried ktslots1 the other day. Pretty standard stuff, you know? Some familiar titles. Might be worth a spin if you’re after something simple. Check them out at ktslots1.
Newmacau, huh? Interesting name. I’m always up for trying new things. Wish me luck! newmacau
RR3game got me hooked! Seriously fun and easy to get into. Definitely recommend giving rr3game a try!
Just trying to log into 44betlogin. Fingers crossed the process is smooth and I can get straight to the games. No one likes a complicated login! 44betlogin
Alright, time to give 7ggg a shot. Hopefully, it’s got something unique to offer. Always hunting for that next favorite spot! 7ggg