Suhas Anna Kande Appointed as In-Charge District Organization Chief
शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची “प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख” पदावर नियुक्ती केली आहे.
हे पद शिवसेनेच्या संघटन रचनेत पहिल्यांदाच निर्माण करण्यात आले असून, जिल्हा प्रमुखांच्या वरच्या स्तरावरील हे महत्त्वाचे स्थान मानले जात आहे. (Suhas Anna Kande Appointed as In-Charge District Organization Chief)
या नियुक्तीचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, भाऊसाहेब चौधरी आणि राम रेपाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी आ. कांदे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीसाठी ही पायरी निर्णायक ठरणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक मजबूत करण्याचा हेतू या नियुक्तीमागे स्पष्ट दिसतो.
नियुक्तीनंतर आमदार सुहास कांदे म्हणाले – (Suhas Anna Kande Appointed as In-Charge District Organization Chief)
“ही केवळ पदनियुक्ती नसून प्रत्येक शिवसैनिकाच्या त्यागाचा आणि निष्ठेचा सन्मान आहे. नाशिक जिल्हा हा शिवसेनेचा गड आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा आधार घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवा फडकवू. शिवसेना ही सत्ता नव्हे, तर सेवा आहे. सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने संघटनशक्तीचे आदर्श उदाहरण साकारू.”
आ. कांदे यांनी पूर्वीही पंजाबमधील पूरग्रस्तांना मदत मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला होता, ज्यातून त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय आला होता. त्यामुळे आता त्यांच्या नव्या जबाबदारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
MHDU News : Vishal Bhadane Suhas Anna Kande Appointed as In-Charge District Organization Chief


Okay, megafishingvn looks like a blast! Who doesn’t love shooting fish for prizes? The graphics are pretty good too. Going to give this a whirl! Check it out megafishingvn.