Stop Toll Collection on Nashik-Pune Highway :
नाशिक–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या कॉंक्रिटिकरण आणि पुलांच्या कामांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर परिस्थितीचा विचार करून आमदार सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना Stop Toll Collection on Nashik-Pune Highway निवेदन पाठवले असून, “कामे पूर्ण होईपर्यंत टोलवसुली थांबवा” अशी मागणी केली आहे.
पूर्वी संगमनेर ते नाशिक हा प्रवास केवळ एका तासात पूर्ण होत होता, मात्र सध्या त्याच अंतरासाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागत आहे. नाशिक ते पुणे प्रवास तब्बल सहा तासांपर्यंत वाढला आहे. महामार्गावरील मोठे खड्डे, अपुरे वाहतूक नियोजन आणि अत्यंत संथ कामकाजामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
विशेषतः घुलेवाडी (ता. संगमनेर) आणि नांदूरशिंगोटे (ता. सिन्नर) येथील पुलांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे प्रवाशांना तासंतास वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे. तरीही शिंदे पळसे, हिवरेगाव पवसा आणि आळेफाटा टोल नाक्यांवर नियमित टोल वसुली सुरूच आहे, हे नागरिकांवर अन्यायकारक असल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले.
आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्या पत्राद्वारे दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत —
1️⃣ सुरू असलेल्या महामार्ग कामांचा वेग वाढवावा.
2️⃣ कामे पूर्ण होईपर्यंत टोलवसुली तातडीने थांबवावी.
नाशिक-पुणे महामार्ग हा हजारो प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या विषयावर केंद्र सरकारने तातडीने लक्ष देऊन ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Stop Toll Collection on Nashik-Pune Highway

Nashik Crime: फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी BJP नेत्याला पोलिसांची चौकशी, नाशिकमध्ये राजकीय हालचालींना वेग
mhdunews #mhdusocial #Nashik #Pune #Highway #SatyajitTambe #NitinGadkari #TollStop #Maharashtra #RoadWork

