Satpur petrol blast accident during tree cuttingसातपूर महादेवनगरमध्ये वृक्षतोडीदरम्यान पेट्रोलचा स्फोट, बालकासह ७ जण भाजले

Satpur Petrol Blast :

Nashik News: नाशिक शहरातील सातपूर परिसरात आज मोठी दुर्घटना घडली आहे. महादेवनगर भागात वृक्षतोडीच्या कामादरम्यान पेट्रोलचा भडका उडाल्याने भीषण स्फोट झाला आणि या घटनेत एका लहान बालकासह एकूण ७ जण गंभीर भाजले आहेत.

महापालिकेतर्फे सातपूरच्या महादेवनगर परिसरात झाडे तोडण्याचे काम सुरू होते. यावेळी झाडे तोडण्यासाठी आणलेले पेट्रोल बाजूला ठेवलेले असताना, एका इसमाने लिंबाच्या झाडाखाली विडी पेटवण्यासाठी माचिस पेटवली आणि त्यामुळे अचानक पेट्रोलचा भडका उडून मोठा स्फोट झाला 💥.

स्फोटानंतर घटनास्थळी अफरातफर माजली. भाजलेल्या ७ कामगारांमध्ये एका लहान बालकाचाही समावेश असून, सर्व जखमींना तात्काळ नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 🚑

या घटनेनंतर अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. वृक्षतोडीच्या कामादरम्यान निष्काळजीपणामुळे घडलेली ही दुर्घटना स्थानिक परिसरात भीतीचं वातावरण निर्माण करणारी ठरली आहे.

Satpur Petrol Blast

Nashik News: नवरात्रीत वाहन विक्रीचा धडाका, आरटीओला तब्बल ₹23 कोटींचा महसूल

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

One thought on “Satpur Petrol Blast: सातपूरमध्ये वृक्षतोडीदरम्यान भीषण स्फोट, बालकासह ७ जण भाजले 🚨”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *