शनिवारवाडा नमाज वाद राष्ट्रवादी काँग्रेस मेधा कुलकर्णी : Pune Shaniwarwada Namaz Row
शनिवारवाडा परिसरात मुस्लिम महिलांनी नमाज पठण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता राजकीय वादाला उधाण आले आहे. या प्रकरणावर खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाडा येथे धाव घेत भगवा फडकवण्याचा आग्रह धरला होता. त्यांच्या या भूमिकेचा विविध राजकीय पक्ष आणि समाजकार्यकर्त्यांकडून विरोध होत आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक झाली असून, पक्षाच्या प्रवक्त्या ॲड. रुपाली ठोंबरे पाटील यांनी खासदार मेधा कुलकर्णी यांना अटक करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमवार रोजी शनिवारवाडा येथे आंदोलन करत भाजपवर धार्मिक तणाव निर्माण करण्याचा आरोप केला. Pune Shaniwarwada Namaz Row
रविवारी भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि पतित पावन संघटनेच्या सदस्यांनी शनिवारवाड्यात आंदोलन करत परिसरातील दरगाह हटवण्याची मागणी केली होती. तसेच नमाज पठण करणाऱ्या महिलांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. (Pune Shaniwarwada Namaz Row)
दरम्यान, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्यांचा तीव्र निषेध करत सांगितले की, “दिवाळीसारख्या सणाच्या काळात शांततेचा संदेश देण्याऐवजी धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे, जे समाजासाठी घातक आहे.”
या वादामुळे पुण्यातील शनिवारवाडा परिसर पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
MHDU News – Vishal Bhdane Pune Shaniwarwada Namaz Row
तेजस MK1A ची खास वैशिष्ट्यं: (Swadeshi Tejas MK1A HAL Nashik)
Pune #Shaniwarwada #MedhaKulkarni #RupaliThombrePatil #NCP #SharadPawarGroup #BJP #PatitPawanSanghatana #NamazVideo #PunePolitics #MaharashtraNews #MHDUnews #mhdunews #mhdusocial


80winbet4 tem me dado sorte! Ganhei uma grana boa nas apostas de futebol semana passada. Continuarei apostando por aqui 80winbet4.