Pune Kondhwa Firing Ganesh Kale
पुणे शहर पुन्हा एकदा धक्कादायक गुन्ह्यामुळे हादरले आहे. कोंढवा परिसरात शनिवारी दुपारी खडी मशीन चौकाजवळ झालेल्या गोळीबारात आंदेकर टोळीशी संबंधित सागर काळेचा भाऊ गणेश काळे याचा मृत्यू झाला आहे. गोळीबारानंतर परिसरात प्रचंड गोंधळ उडाला असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गणेश काळे हा आंदेकर टोळीतील नंबरकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सागर काळे याचा सख्खा भाऊ होता. शनिवारी दुपारी तो आपल्या काही मित्रांसह परिसरात उभा असताना, अज्ञात आरोपी मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी गणेश काळेवर सलग चार गोळ्या झाडल्या. इतकंच नव्हे तर आरोपींनी त्याच्यावर कोयत्यानेही वार केला. या हल्ल्यात गणेश काळे जागीच ठार झाला. (Pune Kondhwa Firing Ganesh Kale)
घटनेनंतर आरोपी पळून गेले असून, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. कोंढवा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखा पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिसर सील करण्यात आला असून, आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. प्राथमिक तपासात हा हल्ला टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
सागर काळे हा आंदेकर टोळीशी संलग्न असून, काही वर्षांपूर्वीच्या आयुष कोमकर हत्याकांडात आरोपी म्हणून त्याला अटक करण्यात आली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. पोलिसांच्या मते, जुन्या वैरातून ही हत्या झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. (Pune Kondhwa Firing Ganesh Kale)
घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोंढवा परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. गुन्हे शाखेचे अधिकारी स्वतंत्र पथक तयार करून आरोपींच्या शोधासाठी प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
या घटनेमुळे पुणे शहरात पुन्हा एकदा टोळीवाद आणि गुंडगिरीचा मुद्दा चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात टोळ्यांमधील वाद, हल्ले आणि गोळीबाराच्या घटना वाढत आहेत. नागरिकांकडून पोलिस प्रशासनाने अशा घटनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (Pune Kondhwa Firing Ganesh Kale)
गणेश काळेच्या मृत्यूमुळे आंदेकर टोळीतील अंतर्गत गटांमध्ये तणाव निर्माण झाला असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणाचे परिणाम आणखी गंभीर होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी हल्लेखोरांना ओळख पटवण्यासाठी तांत्रिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि मोबाईल लोकेशनचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. गुन्हे शाखेच्या सूत्रांनुसार, आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे.
कोंढवा परिसरातील नागरिकांना मात्र या घटनेनंतर रात्रीच्या वेळेस बाहेर जाण्यास भीती वाटत आहे. पुण्यातील वाढत्या गुंडगिरीवर नियंत्रण आणण्यासाठी अधिक कठोर पावले उचलण्याची मागणी सोशल मीडियावरूनही होत आहे.
MHDU News : Vishal Bhadane Pune Kondhwa Firing Ganesh Kale


[…] Pune Kondhwa Firing Ganesh Kale : आंदेकर टोळीतील सागर काळे… […]
Playing io, my dudes! Heard good things and gave it a shot. So far, so good. Give it a whirl! Check it out: playing io
Yo, fabetafterlife sounds kinda mysterious. I’m intrigued. Gonna check it out. fabetafterlife