Pune Crime Heat :
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांना पत्रकारांनी थेट प्रश्न केला. मात्र गुन्हेगारीवरील उत्तर देण्याऐवजी मोहोळ यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. (Pune Crime Heat)
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर गुन्हेगारीमुळे चर्चेत आहे. ठाकरे सेनेचे आमदार अनिल परब यांनी “पुण्यात तब्बल ७० गँग सक्रिय आहेत” असा दावा करत सरकारवर टीका केली आहे. त्यानंतर पत्रकार परिषदेत खासदार मोहोळ यांना पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न विचारला गेला.
पत्रकारांनी वारंवार “शहरातील वाढती गुन्हेगारी आणि गँगवारच्या घटना वाढत आहेत, यावर तुमचं मत काय?” असा प्रश्न उपस्थित केला. मात्र खासदार मोहोळ यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर न देता विषय टाळला आणि परिषदेतून बाहेर पडले.
याच परिषदेत महायुतीमधील अंतर्गत राजकारण आणि निलेश घायवळ प्रकरणावरही प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र, खासदारांनी या मुद्द्यांवरही मौन पाळल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, घायवळ प्रकरणामुळे सरकारची डोकेदुखी वाढली असून, विरोधकांनी यावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे.
Pune Crime Heat

Nashik Crime: फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी BJP नेत्याला पोलिसांची चौकशी, नाशिकमध्ये राजकीय हालचालींना वेग
PuneCrime #MurlidharMohol #AnilParab #NileshGhaywal #MahayutiPolitics #PuneNews #MaharashtraNews #MHDU #mhdunews #mhdusocial


[…] […]