नवरात्रीच्या पवित्र प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार, दि. २१) राष्ट्राला संबोधित करत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, देशात नवरात्रोत्सवाबरोबरच “बचत उत्सव” सुरू होणार असून, GST कपात हा या उत्सवाचा मुख्य आधार असेल.
🔹 जीएसटी 2.0 मुळे विकासाला चालना
मोदींनी स्पष्ट केले की पूर्वीची कर प्रणाली गुंतागुंतीची होती. मात्र GST लागू केल्यानंतर अर्थव्यवस्थेला वेग मिळाला. आता कपातीनंतर देशाच्या विकासाला नवे बळ मिळेल आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे पाऊल महत्त्वाचे ठरेल.
🔹 99 टक्के वस्तूंवर फक्त 5% कर
या सुधारनेनंतर देशातील 99% वस्तूंवर फक्त 5% GST लागू होणार आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू स्वस्त होतील तसेच टीव्ही, एसी, कार, इलेक्ट्रिक स्कुटर यांच्यावरील कर घटल्याने मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळेल.
🔹 लघू उद्योगांना चालना
लघू, कुटीर व सूक्ष्म उद्योगांना या कर सुधारणेतून मोठा फायदा होईल. ‘भारत निर्मिती व भारत विक्री’ हे चक्र वेगाने फिरणार असल्याचे मोदींनी सांगितले.
🔹 मेड इन इंडियाचा निर्धार
पंतप्रधानांनी आवाहन केले की, भारतीय वस्तूंचा वापर हा आता अभिमानाचा विषय व्हावा. ‘स्वदेशीचा नारा’ पुन्हा बुलंद करण्याची वेळ आली असून यामुळे देशातील उद्योगांना प्रोत्साहन मिळेल.
🔹 प्रत्येक घरात बचतीचा आनंद
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होणार असून, प्रत्येक घरात बचतीचा आनंद पसरेल. ‘एक राष्ट्र, एक कर’चे स्वप्न आता साकार झाले आहे, असे मोदींनी संबोधनात म्हटले.

