Parth Pawar Land Scam Noticeपार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप; ६ कोटींच्या मुद्रांक शुल्काची वसुली करण्याचे आदेश

Parth Pawar Land Scam Notice

मोठी बातमी समोर आली आहे! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप झाले आहेत. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर मोक्याच्या जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार केल्याचा आरोप पुढे आला आहे. या व्यवहारातून मूळ मालक आणि शासनाची फसवणूक झाल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.

या प्रकरणात पार्थ पवार यांच्या ‘अमेडीया कंपनी’ला आता नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

सदर जमिनीची बाजारभावानुसार किंमत सुमारे 1800 कोटी रुपये असून, ती केवळ 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप होत आहे. त्यातही 300 कोटींच्या व्यवहारावर केवळ 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क भरल्याचे उघड झाले आहे. प्रत्यक्षात या व्यवहारावर सुमारे 6 कोटी रुपयांचे शुल्क भरणे आवश्यक होते. (Parth Pawar Land Scam Notice)

मुद्रांक शुल्क विभागाने याच कारणावरून अमेडीया कंपनीला नोटीस पाठवून 6 कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या नोटीशीनंतर विभागाकडून पुढील कारवाई होणार का? हे लक्षवेधी ठरणार आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? Parth Pawar Land Scam Notice
कोरेगाव पार्कमधील सुमारे 40 एकर जमीन ही या वादाचा केंद्रबिंदू आहे. ही जमीन वास्तविक बाजारभावानुसार 1800 कोटी रुपयांची असून, ती कमी किमतीत आणि कमी शुल्क भरून घेतल्याचा आरोप आहे. सध्या विभागीय चौकशी सुरू असून, या व्यवहारातील नियमभंग आणि आर्थिक गैरव्यवहार तपासले जात आहेत.

MHDU News : Vishal Bhadane

Indurikar Maharaj Daughter Engagement : इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च?; डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांची टीका

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

2 thoughts on “Parth Pawar Land Scam Notice : पार्थ पवार यांना मोठा दणका! जमीन घोटाळ्याचा आरोप; मुद्रांक शुल्क विभागाकडून थेट आदेश”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *