Vani Police Action on Social Media Reel Case – Nashik Rural Policeरिल्सद्वारे दहशत निर्माण करणाऱ्यांना वणी पोलिसांचा दणका; शहरभर काढली धिंड 🚔

Nashik Vani Police Action

वणी (नाशिक): सोशल मीडियावर “डोक्यात झांज” म्हणत धमकीसदृश रील पोस्ट करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा तरुणांना वणी पोलिसांनी अटक करून शहरभर धिंड काढली आहे. या घटनेमुळे नाशिक पोलिसांनी गुन्हेगारीवर पुन्हा एकदा कडक कारवाई करत कायद्याचा वचक दाखवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ता. १४ ऑक्टोबर रोजी वणी पोलिसांना सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या काही व्हिडिओंची माहिती मिळाली. या व्हिडिओंमध्ये काही युवक धमकीच्या भाषेत संवाद बोलताना आणि दहशतीचे वातावरण निर्माण करताना दिसत होते. (Nashik Vani Police Action)

पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून जयराम सुभाष पवार, रोहित पुंडलिक जाधव आणि भूषण सोमनाथ पवार (रा. जगदंबा नगर, लेंडीपुरी, वणी) या तिघांना ताब्यात घेतले. व्हिडिओंमध्ये आरोपींनी “वणीकर आहे, आता चुकीत घावा तुम्ही; तांडव करतो आम्ही, डायरेक्ट डोक्यात झांज” असे संवाद वापरले होते. अशा प्रकारचे संवाद आणि पार्श्वसंगीत समाजात भीती व असुरक्षितता निर्माण करू शकतात, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

या तिघांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. सायंकाळी सातच्या सुमारास पोलिसांनी त्यांची धिंड डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून काढत संपूर्ण वणी शहरातून फिरवली. या वेळी पोलिसांनी आरोपींकडून “नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला” या घोषणा द्यावयास लावून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

या कारवाईविषयी सपोनि गायत्री जाधव यांनी सांगितले, “काही तरुण चुकीच्या प्रकारचे रिल्स तयार करत होते. माहिती मिळताच आमच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. कायदा हातात घेणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही.”

ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पोलिस उपनिरीक्षक हेमंत राऊत आणि कर्मचारी यांचा या मोहिमेत सहभाग होता. वणी पोलिसांच्या या तातडीच्या आणि दणदणीत कारवाईने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कायद्याबद्दलचा आदर व शिस्तीचा संदेश गेला आहे.

MHDU News : Vishal Bhdane Nashik Vani Police Action

Girish Mahajan Taunted Dada Bhuse: “Trump आणि भुसे यांचे घनिष्ट संबंध असतील!”

NashikPolice #WaniPolice #MHDUnews #MHDUsocial #NashikRural #LawAndOrder #SocialMediaCrime #PoliceAction #HatsOffPolice #CrimeFreeNashik

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

One thought on “Nashik Crime: Nashik Vani Police Action, Reels ने दहशत निर्माण करणाऱ्या 3 युवकांना वणी पोलिसांचा दणका; आंबेडकर चौकातून काढली धिंड”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *