Nashik Political Crime :
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी राजकीय वातावरण तापले आहे. नुकताच भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलेले मामा राजवाडे (Mama Rajwade) यांना नाशिक पोलिसांनी (Nashik Politcal Police) कसून चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. (Nashik Crime)
मामा राजवाडे हे पूर्वी ठाकरे गटाचे महानगरप्रमुख होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी सुनील बागुल यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावल्याने चर्चांना उधाण आले आहे.
गंगापूर रोड परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात राजवाडे यांची सुमारे 10 तासांपर्यंत चौकशी करण्यात आली. या प्रकरणात सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल याला अटक झाली असून इतर आरोपी अजूनही फरार आहेत. जुन्या वादातून झालेल्या या गोळीबारात गुन्हा सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल आहे.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, मामा राजवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश हा पोलिस कारवाईपासून वाचण्यासाठी केला होता, अशी चर्चा होती. मात्र, आता फडणवीसांच्या नाशिक दौर्याच्या आधीच त्यांची चौकशी झाल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे पोलिसांची हालचाल वाढली आहे. सातपूर गोळीबार प्रकरणात लोंढे टोळीतील देवेश शिरताटे आणि शुभम गोसावी या दोघांना अटक करण्यात आली आहे. पवन पवार आणि इतर आरोपींचा शोध सुरु आहे. आरपीआय नेते प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे यांनाही याच प्रकरणात अटक झाली असून ते पोलीस कोठडीत आहेत.
नाशिक पोलिसांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांवर कारवाई सुरू असल्याची चर्चा सध्या नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात रंगली आहे.
👉 अशाच ताज्या अपडेटसाठी MH Daily Update (mhdu.in) ला फॉलो करा.
Nashik Political Crime

Source : going disscution in nashik peopl, So google Searched for confirmation
Nashik: नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला! आरपीआयचे प्रकाश लोंढे आणि मुलगा दीपक लोंढे अटकेत, पोलिसांनी उतरवला माज
NashikCrime #DevendraFadnavis #MamaRajwade #NashikNews #mhdunews #mhdusocial


[…] […]
[…] […]