Nashik Municipal Election Nomination Hug Rush
नाशिक : पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा वेग शनिवारी अचानक वाढल्याचे चित्र जिल्हाभरात दिसले. दिवसभरात नगराध्यक्षपदासाठी १८, तर सदस्यपदासाठी तब्बल ३२४ अर्ज दाखल झाल्याने कार्यालयांमध्ये विशेष गडबड पाहायला मिळाली. एकूण अर्जांचा आकडा आता नगराध्यक्ष २८ आणि सदस्य ४२५ इतका झाला आहे.
अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस सोमवारी (१७ नोव्हेंबर) असल्यामुळे, उर्वरित इच्छुक महसूल आणि पालिका कार्यालयांकडे धाव घेण्याची शक्यता अधिक आहे. सुरुवातीला मंद गतीने सुरू झालेली प्रक्रिया आता चांगलीच वेगवान झाली असून, अनेक उमेदवारांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन ते तीन अर्ज दाखल केले आहेत.
दर्शनाने सुरुवात, कार्यालयात धावपळ (Nashik Municipal Election Nomination Hug Rush)
अनेक उमेदवारांनी शनिवारी सकाळी हनुमान मंदिरात दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात केली. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी थेट उमेदवारी फॉर्म जमा करण्यासाठी सरकारी कार्यालयात हजेरी लावली. दिवसभरात उमेदवारांची सतत ये-जा सुरू राहिली.
शनिवारी विविध पालिकांमध्ये दाखल झालेल्या अर्जांची संख्या (Nashik Municipal Election Nomination Hug Rush)
त्र्यंबकेश्वर : सदस्य ८० | नगराध्यक्ष ५
सटाणा : सदस्य ५७ | नगराध्यक्ष ५
चांदवड : सदस्य २८ | नगराध्यक्ष ३
पिंपळगाव : सदस्य ३७ | नगराध्यक्ष ४
सिन्नर : सदस्य ४२ | नगराध्यक्ष १
भगूर : सदस्य २२ | नगराध्यक्ष १
इगतपुरी : सदस्य १
नांदगाव : सदस्य ७
ओझर : सदस्य २१
मनमाड : सदस्य १३
येवला : सदस्य १६
अंतिम मुदतीपूर्वी उमेदवारी प्रक्रियेला प्रचंड वेग आल्याने, जिल्ह्यातील सर्व पालिकांमध्ये निवडणूक वातावरण तापू लागले आहे.
MHDU News : Vishal Bhadane Nashik Municipal Election Nomination Hug Rush

सुहास कांदे vs समीर भुजबळ: नांदगावच्या राजकारणात मोठा कलाटणीकारक निर्णय


[…] […]
Yo, tai188bet looks promising. They’ve got a solid selection of games and the site’s not clunky like others I’ve tried. Worth a look if you’re into online betting. Check out tai188bet and let me know what you think!
Gonna download this fb77705app and see if it’s worth the hype. Wish me luck, people! fb77705app