Nashik KumbhMela Branding Opportunity
नाशिक : दि. ८ (MHDU News) : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ आध्यात्मिक पर्व नसून, महाराष्ट्राचे जागतिक ब्रॅण्डिंग करण्याची मोठी संधी असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांनी केले.
राज्याचे सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक वैभव जगभर पोहोचविण्याची ही एकमेव संधी असल्याने, सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करून हे पर्व भव्य, दिव्य आणि यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव गोविंदराज, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, विभागीय आयुक्त तथा नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, तसेच जिल्हा प्रशासन, पोलिस आणि विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Nashik KumbhMela Branding Opportunity)
मुख्य सचिव म्हणाले, “प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील अनुभव पाहता, नाशिकमध्ये भाविकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढणार आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजन, पार्किंगपासून ते स्नानघाटापर्यंत सुरक्षित वाहतूक, तसेच डिजिटल माध्यमातून भाविकांना मार्गदर्शन देणे अत्यावश्यक आहे.” (Nashik KumbhMela Branding Opportunity)
त्यांनी स्पष्ट केले की, “सिंहस्थ कुंभमेळा हा स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक असा असावा”, यासाठी प्रत्येक यंत्रणेने जबाबदारीने काम करावे. विकास कामांबाबत त्यांनी निर्देश दिले की, सर्व पायाभूत सुविधा मार्च २०२७ पूर्वी पूर्ण व्हाव्यात, भूसंपादन आणि रस्ते आदी कामे वेळेत पूर्ण करण्यावर विशेष भर द्यावा.
मुख्य सचिवांनी पोलिस, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे, आरोग्य, जलसंपदा, वीज वितरण आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांचे सविस्तर परीक्षण केले. संभाव्य अडचणी आणि आपत्ती परिस्थिती विचारात घेऊन आपत्ती व्यवस्थापन आराखडा तत्काळ अद्ययावत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. (Nashik KumbhMela Branding Opportunity)
त्याचबरोबर, महाराष्ट्राच्या कला, संस्कृती आणि परंपरेची ओळख भाविकांना व्हावी, यासाठी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी प्राधिकरणासोबत समन्वय साधावा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत अपर प्रधान सचिव गोविंदराज, प्रधान सचिव एकनाथ डवले, आणि प्रधान सचिव सौरभ विजय यांनीही विविध उपयुक्त सूचना दिल्या.
कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम आणि आयुक्त शेखर सिंह यांनी सादरीकरणाद्वारे प्राधिकरणाच्या सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांचा आढावा सादर केला. (Nashik KumbhMela Branding Opportunity)
मुख्य सचिव राजेशकुमार यांनी अखेरीस आवाहन केले की, “सूक्ष्म नियोजन, समन्वय आणि लोकसहभागाच्या बळावर आपण सिंहस्थ कुंभमेळा २०२७ भव्य, दिव्य आणि आपत्तीविरहित करूया. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला साजेसा असा हा कुंभमेळा जगभरात ओळख निर्माण करेल.”
MHDU News : Vishal Bhadane

कुंभमेळा प्राधिकरणाचे दरवाजे खुले! संस्था, अभ्यासक आणि नागरिकांसाठी भेटीची वेळ निश्चित


[…] 2027: नाशिकसह महाराष्ट्राचे जागhttps://mhdu.in/nashik-kumbhmela-branding-opportunity/तिक ब्रॅण्डिंग करण्याची सुवर्णसंधी – […]
[…] […]
Yo galera, Egurobetbr tá mandando bem no mundo das apostas online! Tem de tudo um pouco, desde esportes até jogos de cassino. O site é fácil de usar e tem umas promoções maneiras. Visitem lá: egurobetbr.
Alternatelinksbobet, clutch to have when the main site’s down. Bookmarked this bad boy. Always a lifesaver, you feel me? alternatelinksbobet