Nashik Kumbh Mela CCTV Scam
नाशिक – भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गर्दी नियंत्रणासाठी सिंहस्थ कुंभमेळ्यात सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र, या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप आम आदमी पक्षाने (AAP) केला आहे.
२०१५ मध्ये नाशिक कुंभमेळ्यासाठी हेच काम ९.९४ कोटी रुपयांमध्ये करण्यात आले होते, पण आता तेच काम २९४ कोटी रुपयांना दिले गेले असल्याने “सीसीटीव्ही घोटाळा” झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
‘आप’च्या राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की — “स्मार्ट सिटी कंपनीने २०१५ च्या आरएफपी (Request for Proposal) ची कॉपी-पेस्ट करून नवीन टेंडर दिले असून, यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. ठाणे शहरातील CCTV टेंडर जशास तसा नाशिकसाठी वापरला गेला.” (Nashik Kumbh Mela CCTV Scam)
स्मार्ट सिटी कंपनीने सीसीटीव्ही बसविण्याचे काम मॅट्रिक्स कंपनीला दिले आहे. हे कॅमेरे शाहीमार्ग, साधुग्राम, गोदाघाट, शहराचे प्रवेशद्वार आणि पार्किंग ठिकाणांवर बसवले जाणार आहेत. सुरुवातीला १,२०० कॅमेरे बसविण्याचे नियोजन होते, पण भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे ही संख्या आणखी वाढविण्यात आली. (Nashik Kumbh Mela CCTV Scam)
स्मार्ट सिटी कंपनीचे म्हणणे आहे की, “जर ‘आप’कडे ठोस पुरावे असतील तर चौकशीस आम्ही तयार आहोत, परंतु बेफाम आरोप करून गोंधळ निर्माण करू नये.” (Nashik Kumbh Mela CCTV Scam)
२०१५ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अशाच प्रकारच्या CCTV अनियमिततेवर चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, अकरा वर्षांनंतरही कायमस्वरूपी CCTV बसविण्यात आलेले नाहीत.
विजय कुंभार यांनी विचारले की — “फक्त कॅमेरे बसविण्याचा खर्च ९.९४ कोटींवरून २९४ कोटींवर कसा गेला? चौकशीचे निष्कर्ष कुठे आहेत आणि जबाबदारी कुणाची?” असा सवाल उपस्थित केला आहे.
MHDU News : Vishal Bhadane Nashik Kumbh Mela CCTV Scam


[…] […]
[…] […]
Need a reliable link for Bong88? linkvaobong88com always seems to have a working one. Saves me a lot of hassle. linkvaobong88com
Heard good things about phdream23 and decided to give it a go. It hasn’t let me down. Plenty of different options and pretty good payouts so far. Definitely worth a look at phdream23 if you are looking for something new.