Nashik Fake Railway Job Scam
नाशिक: सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद झाली असून, सर्वच फसवणुकीमागे संतोष चंद्रकांत कटारे, संतोष शिवराम गायकवाड आणि अमोल ठाकूर या तिघांची नावे पुढे आली आहेत.
पहिला प्रकार: (Nashik Fake Railway Job Scam)
देवळाली कॅम्पमधील मुल्ला कॉम्प्लेक्स येथे संतोष कटारे, गायकवाड आणि ठाकूर या तिघांनी फिर्यादी सोनवणे, त्यांची बहीण संगीता आणि मामा चेतन वानखेडे यांना रेल्वेमध्ये ग्रुप ‘C’ आणि ‘D’ पदावर सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी भारतीय रेल्वे मंत्रालयाचे बनावट लेटरहेड, शिक्के व ऑफर लेटर तयार करून १९ लाख ५० हजार रुपये स्वीकारले. मात्र नोकरी न लागल्याने फिर्यादींनी देवळाली कॅम्प पोलिसांत तक्रार नोंदविली.
दुसरा प्रकार: (Nashik Fake Railway Job Scam)
याच आरोपींनी श्रीकांत पाटील आणि त्यांचा भाऊ मयूर पाटील यांना रेल्वे विभागात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. दोघांकडून प्रत्येकी ८ लाख २५ हजार रुपये, एकूण १६ लाख ५० हजार रुपये घेऊन बनावट ‘भारतीय रेल’ वॉटरमार्क असलेली नियुक्तिपत्रे दिली. तीन वर्षे उलटूनही नोकरी न लागल्याने फसवणूक असल्याचे लक्षात आले आणि पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
तिसरा प्रकार: (Nashik Fake Railway Job Scam)
मयूर कांबळे आणि जयेश कांबळे या दोघांना आरोपींनी रेल्वेत नोकरी लावण्याचे खोटे आश्वासन देऊन १४ लाख रुपयांची फसवणूक केली. मंत्रालयातील अधिकार्यांसोबतचे फोटो दाखवून विश्वास संपादन केला आणि सीएसटी स्टेशनवर खोटे ट्रेनिंग आणि जॉइनिंग लेटर देऊन फसवणूक केली.
तीन वेगवेगळ्या फसवणुकीत मिळून आरोपींनी सात जणांना सुमारे ५० लाख रुपयांचा गंडा घातला आहे. सर्व प्रकरणांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख करत आहेत.
MHDU News : Vishal Bhdane Nashik Fake Railway Job Scam
Nashik #CrimeNews #RailwayJobScam #JobFraud #FakeAppointmentLetter #NashikPolice #MHDU #DeolaliCamp #MaharashtraNews #mhdunews #mhdusocial


[…] सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाख… […]
Brlbetapp1? Curti demais a plataforma! Interface limpa e fácil de usar, e os bônus são bem generosos. Vale a pena experimentar brlbetapp1.