Nashik Cyber Police Crypto Fraud Kerala Arrest
नाशिक : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करून जादा नफ्याचे आमिष दाखवून एका इसमाची तब्बल ₹२ कोटी ७८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या सतर्कतेने या गुन्ह्यातील ₹२० लाख ४४ हजार रुपये गोठविण्यात आले असून, दहा लाख रुपये फिर्यादींना परत मिळाले आहेत.
ही फसवणूक फेसबुकवरील ओळखीतून सुरू झाली. फिर्यादी इसमाला एका अनोळखी महिलेने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. त्याने ती स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले आणि महिलेने त्याचा विश्वास संपादन केला. नंतर तिने क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीत प्रचंड नफा मिळत असल्याचे सांगत त्याला पैसे गुंतवायला प्रवृत्त केले. तिच्या सांगण्यावरून फिर्यादीने एकूण ₹२.७८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.(Nashik Cyber Police Crypto Fraud Kerala Arrest)
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, फिर्यादीने २२ ऑगस्ट २०२५ रोजी नाशिक ग्रामीण सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.(Nashik Cyber Police Crypto Fraud Kerala Arrest)
या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे केरळमधील कोझिकोड परिसरात शोध मोहीम राबवून दोन आरोपींना अटक केली.
अटक आरोपी —
१️. सजा हनून, रा. वेलापलम कँडी, केरळ
२️. अब्दुल बासिथ थंगल, रा. पल्लिकल हाऊस, केरळ
फसवणुकीत वापरलेल्या बँक खात्यांचा मागोवा घेऊन पोलिसांनी आतापर्यंत ₹१० लाख फिर्यादींना परत मिळवून दिले असून ₹२०.४४ लाख रुपये गोठवले आहेत. न्यायालयीन आदेशानुसार ही रक्कम फिर्यादींना परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या कारवाईत पोलीस हवालदार हेमंत गिलबिले व प्रदीप बहिरम यांनी मोलाची भूमिका बजावली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे —
📞 फसवणूक झाल्यास त्वरित 1930 किंवा 1945 वर संपर्क साधा.
🕵️♂️ MHDU News तुमच्यासाठी आणत आहे सर्वात जलद अपडेट्स 🔥
MHDU News : Vishal Bhadane Nashik Cyber Police Crypto Fraud Kerala Arrest
RPI Leader Prakash Londhe Illegal Empire Crushed! | आरपीआय नेता प्रकाश लोंढेच्या अनधिकृत साम्राज्यावर मनपा व पोलिसांची संयुक्त कारवाई
CryptoScam #NashikCyberCrime #KeralaArrest #CyberFraud #MHDUnews #mhdusocial #CryptoFraud #CyberAlert


[…] […]
Alright, checked out gembetapp. Easy to use and everything seems in its place, worth a quick look. Check it out at gembetapp