Nashik Criminal NMC Reservation
नाशिक | राज्यातील मुंबई, पुणे यांसह इतर महापालिकांच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली असून, त्याचबरोबर नाशिक महानगरपालिकेच्या १२२ प्रभागांसाठीही आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
यामध्ये सर्वसाधारण – ६२, ओबीसी – ३३, अनुसूचित जाती – १८, अनुसूचित जमाती – ५ आणि महिलांसाठी राखीव ६१ जागा असा विभागणीचा तपशील आहे.
या आरक्षण सोडतीत नाशिकमधील तीन माजी नगरसेवकांना — जे सध्या तुरुंगात आहेत — दिलासा मिळाल्याचे चित्र दिसून आले आहे. निवडणुकीचा माहोल रंगत असताना, या घडामोडीमुळे नाशिकच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. (Nashik Criminal NMC Reservation)
माहितीनुसार, भाजपचे माजी नगरसेवक उद्धव (बाबा) निमसे, भाजपचे जगदीश पाटील, आणि आरपीआय (आठवले गट) चे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे हे तिघेही सध्या कारागृहात आहेत. तरीदेखील त्यांच्या संबंधित प्रभागांमध्ये आरक्षणाची सोय त्यांच्या बाजूने गेली आहे. (Nashik Criminal NMC Reservation)
उद्धव निमसे यांचा प्रभाग क्रमांक २(क) आहे. काही दिवसांपूर्वी नांदूर नाका परिसरातील राहुल धोत्रे हत्येप्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे समोर आलं होतं. त्यानंतर त्यांनी स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आणि तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.
भाजपचे दुसरे माजी नगरसेवक जगदीश पाटील, पेठरोड गोळीबार प्रकरणात अडचणीत आले. सागर जाधव या सराईत गुन्हेगारावर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांचा प्रभाग क्रमांक ४(क) आहे. (Nashik Criminal NMC Reservation)
तर प्रकाश लोंढे (आरपीआय) यांचा प्रभाग क्रमांक ११(अ) आहे. मागील निवडणुकीत या प्रभागात महिला आरक्षण असल्याने त्यांनी आपल्या सुनेला उमेदवारी दिली होती. पण यंदा तोच प्रभाग अनुसूचित जाती पुरुषांसाठी राखीव ठरल्याने लोंढे तुरुंगातूनच निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे. सातपूर गोळीबार, खंडणी आणि खून अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर आरोप आहेत.
या पार्श्वभूमीवर आता प्रश्न असा आहे की — गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या या नेत्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल का? आणि मिळालीच तर, सुजाण नाशिककर अशा प्रवृत्तीच्या उमेदवारांना निवडून देतील का? हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
MHDU News : Vishal Bhadane



Alright folks, heard about nilfortuneonline and thought I’d see what the buzz is about. Seems promising, gonna give it a go. Find out more at nilfortuneonline.
218phspinlogin – sounds like a good time! Quick login, and you’re ready to go. See what you’re missing: 218phspinlogin