Nashik Bhonsala School Leopard Updateभोसला शाळेतील ‘बिबट्या’ प्रकरणात वन विभागाचा खुलासा – परिसरात कोणताही वावर नाही, ट्रॅप कॅमेरे व थर्मल ड्रोन तपासणी सुरू!

Nashik Bhonsala School Leopard Update

नाशिक : भोसला मिलिटरी स्कूल परिसरात बिबट्या शिरल्याची चर्चा होत असताना वनविभागाने महत्त्वाची स्पष्टता दिली आहे. आज सकाळी बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच वन विभागाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि शोधमोहीम राबवली. (Nashik Bhonsala School Leopard Update)

तपासणीदरम्यान शाळा, हॉस्टेल वा कॅम्प परिसरात बिबट्याचा कोणताही वावर आढळून आलेला नाही, असे अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे. (Nashik Bhonsala School Leopard Update)

परिसरात सावधगिरी म्हणून आठ ट्रॅप कॅमेरे बसवले जात असून, ज्या ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत त्या फुटेजची तपासणी शाळा प्रशासनाच्या मदतीने सुरू आहे.

विद्यार्थ्यांसाठी जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले असून, परिसरातील दाट गवत, झुडपी वाढ हटविण्याचे काम शाळेकडून सुरू करण्यात आले आहे.

वन विभागाने कळवले की, आज रात्री विशेष गस्त, थर्मल ड्रोन तपासणी आणि शोधमोहीमही राबवली जाणार आहे.

वन विभागाचे आवाहन :

नागरिकांनी घाबरून जाऊ नये

खात्रीशिवाय अफवा पसरवू नये

बिबट्याचा वावर दिसल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा

MHDU News : Vishal Bhadane

धक्कादायक! नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेत बिबट्या शिरला; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

4 thoughts on “Nashik Bhonsala School Leopard Update : भोसला शाळा परिसरात ‘बिबट्या’ नव्हता – वन विभागाचा खुलासा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *