धुळे येथे मंकीपॉक्सचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आढळलाधुळे येथे परदेशातून आलेल्या व्यक्तीस मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्याची पुष्टी — महाराष्ट्रातील पहिला रुग्ण

Monkeypox Maharashtra First Case Dhule

धुळे : महाराष्ट्रात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण धुळ्यात आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. विदेशातून परतलेल्या ४४ वर्षीय व्यक्तीचा हा प्रकरण असून, त्याचे दोन्ही चाचणी अहवाल सकारात्मक आले आहेत. या रुग्णाला हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे यांनी दिली.

सदर व्यक्ती दोन ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियाहून धुळ्यात आली होती. तो गेली चार वर्षे सौदीत वास्तव्यास होता आणि आपल्या मुलीच्या लग्नासाठी भारतात आला होता. शहरात आल्यावर त्याला त्वचेवरील पुरळ आणि खाज जाणवू लागल्याने त्याला तीन ऑक्टोबर रोजी हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. संशय आल्यावर त्याचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (NIV Pune) पाठविण्यात आले, आणि दोन्ही वेळा अहवाल पॉझिटिव्ह आले.

Monkeypox Maharashtra First Case Dhule

या घटनेनंतर संपूर्ण रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्याची पत्नी आणि मुलगा यांच्या तपासण्या निगेटिव्ह आल्या आहेत.

मंकीपॉक्स (एमपॉक्स) हा विषाणूजन्य संसर्गजन्य आजार असून, ताप, अंगावर पुरळ, लसिका ग्रंथी सुजणे, फोड व खाज येणे अशी लक्षणे दिसतात. हा आजार सामान्यतः दोन ते चार आठवडे टिकतो. तज्ञांच्या मते, शरीर हायड्रेट ठेवणे, पौष्टिक आहार घेणे, आणि पुरेशी विश्रांती घेणे हे लक्षणे कमी करण्यासाठी महत्त्वाचे ठरते.

आरोग्य विभागाने नागरिकांना घाबरू नये पण काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. रुग्णालय प्रशासनाने सर्व खबरदारीचे उपाय राबवले असून, परिस्थितीवर काटेकोर लक्ष ठेवले जात आहे.

MHDU News : Vishal Bhadane Monkeypox Maharashtra First Case Dhule

Nashik Crime Pavan Pawar : ‘आमचंच साम्राज्य, कोणी लागत नाही नादी!’ 0— शिंदे गटाच्या फरार नेत्याचं ‘रील’ व्हायरल; पवन पवारवर आणखी एक गुन्हा दाखल

Dhule #Monkeypox #MaharashtraHealth #HealthUpdate #VirusAlert #NIVPune #MHDUnews #mhdusocial

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

One thought on “Monkeypox Maharashtra First Case Dhule | धुळे : महाराष्ट्रात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला……0”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *