Malegaon Dongrale Minor Girl Murder Case
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे परिसरात सव्वाचार वर्षांच्या निरागस चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची अतिशय निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना रविवारी (१६ नोव्हेंबर) समोर आली. या घटनेने संपूर्ण जिल्हा संतप्त झाला असून सोमवारी (१७ नोव्हेंबर) ग्रामस्थांनी मालेगाव–कुसुंबा महामार्गावर ५ तासांचा तीव्र रस्ता रोको करून आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी केली.
गावातील संशयित विजय संजय खैरनार (वय २९) याने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून पीडित मुलीला घराच्या मागील मोकळ्या जागेत नेले. तेथे तिच्यावर क्रूर अत्याचार करून दगड व धारदार वस्तूने मारहाण केल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतदेह मोबाईल टॉवरजवळील झुडपांमध्ये फेकून देण्यात आला होता. गावातील तरुणांनी सुरू केलेल्या शोधमोहीमेदरम्यान मुलीचा निर्वस्र अवस्थेतील मृतदेह सापडताच गावात शोककळा पसरली. (Malegaon Dongrale Minor Girl Murder Case )
मुलीच्या मृतदेहाच्या घराजवळील भिंतीवर रक्ताचे डाग दिसल्याने पोलिसांनी संशयित विजयला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला २० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून त्याचे घर पोलिसांनी सील केले आहे.
या घटनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, खासदार सुप्रिया सुळे, चित्रा वाघ यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी कठोर शब्दांत निषेध केला. दादा भुसे यांनी गावाला भेट देऊन कुटुंबीयांशी संवाद साधला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हमीवर मृतदेह ताब्यात घेऊन संध्याकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
डोंगराळे गावात दिवसभर चुली पेटल्या नाहीत. महिलांनी, तरुणांनी आणि बालकांनी रस्त्यावर उतरून “आरोपीला फाशी द्या” अशी मागणी केली. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या घोषणांचा उल्लेख करत आंदोलनातील मुलींनी तीव्र भावना व्यक्त केल्या. या प्रकरणाचा तपास उपअधीक्षक यशवंत बाविस्कर यांच्या अखत्यारी सोपविण्यात आला असून जलद न्यायालयात खटला चालविण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. (Malegaon Dongrale Minor Girl Murder Case )
नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी “सखोल तपास करुन आरोपीस कठोर शासन केले जाईल”, असे आश्वासन दिले आहे. तर खटला ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या मार्फत चालविण्याची मागणीही करण्यात आली आहे. (Malegaon Dongrale Minor Girl Murder Case )
डोंगराळ्यातील या निर्घृण कृत्यामुळे संपूर्ण परिसर शोक आणि संतापाच्या छायेत असून मुलीला न्याय मिळावा, हीच सर्वांची एकमुखी मागणी आहे.
MHDU News : Vishal Bhadane
मालेगाव तालुक्यात 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, दगडाने ठेचून निर्घृण हत्या


777kingcom is the real deal! I’ve been playing here for a while, and I’ve actually won some money! The site is reliable, and the customer service is pretty good too. Give 777kingcom a shot!
Jili128 is my lucky number! Been winning a bit lately. Maybe you’ll have some luck too. Give Jili128 a whirl today! jili128