Maharashtra TET Exam 2025
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही परीक्षा राज्यातील प्राथमिक (इयत्ता 1-5) आणि उच्च प्राथमिक (इयत्ता 6-8) शिक्षक पदांसाठी अनिवार्य आहे.
👉 अर्ज प्रक्रिया:
सुरूवात: 15 सप्टेंबर 2025
शेवटची तारीख: 3 ऑक्टोबर 2025
अर्ज शुल्क: फक्त ऑनलाइन (नेट बँकिंग/डेबिट/क्रेडिट कार्ड)
प्रवेशपत्र डाउनलोड: 10 ते 23 नोव्हेंबर 2025
👉 परीक्षा दिनांक:
पेपर 1 (प्राथमिक स्तर): 23 नोव्हेंबर 2025, सकाळी 10:30 – दुपारी 1:00
पेपर 2 (उच्च प्राथमिक स्तर): 23 नोव्हेंबर 2025, दुपारी 2:30 – सायं. 5:00
👉 महत्वाची लिंक:
अधिकृत वेबसाइट: mscepune.in
MAHATET लिंक: mahatet.in
👉 महत्वाच्या सूचना:
चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द केली जाईल.
एकाच उमेदवाराने दोन्ही पेपरसाठी अर्ज केल्यास त्याला एकच परीक्षा केंद्र मिळेल.
पूर्वीच्या गैरव्यवहार प्रकरणात सामील असलेले उमेदवार पात्र नाहीत.
📞 हेल्पलाईन क्रमांक: 9028472681/82/83 (सकाळी 10 ते संध्याकाळी 6)

