Maharashtra Local Elections 2025 :
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Maharashtra Local Elections 2025) निवडणुकांची धामधूम पुन्हा रंगणार आहे. दिवाळी उत्सवानंतर नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजणार असून, नगराध्यक्ष पदांसाठी आरक्षणाची सोडत येणाऱ्या सोमवारी मंत्रालयात काढली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या प्रतिनिधींना सोडतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासकीय स्तरावर निवडणुकीपूर्व सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून, निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीचे सर्व आवश्यक निर्णय घेण्यात येत आहेत.
🔹 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आरक्षण 13 ऑक्टोबरला: (Maharashtra Local Elections 2025)
राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आरक्षण ठरवण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढली जाणार आहे. त्यापूर्वी संबंधित जिल्हाधिकारी 10 ऑक्टोबरला वृत्तपत्रांत आरक्षणासंदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील.
प्रारूप आरक्षणावर 14 ते 17 ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर सर्व सूचना विचारात घेऊन अंतिम आरक्षण 3 नोव्हेंबर 2025 रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध केले जाईल.
🔹 247 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींसाठी निवडणुका: (Maharashtra Local Elections 2025)
राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींमध्ये सदस्यपदांसह थेट नगराध्यक्ष पदांसाठीची सार्वत्रिक निवडणुका या वर्षाच्या अखेरीस होणार आहेत.
प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाईल.
त्यावर हरकती व सूचना 13 ऑक्टोबरपर्यंत दाखल करता येतील.
अंतिम मतदार यादी 28 ऑक्टोबर 2025 रोजी प्रकाशित केली जाईल.
यामध्ये 1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादीच या निवडणुकांसाठी लागू राहणार आहे. मतदार यादीतील नावे, पत्ते यामध्ये राज्य निवडणूक आयोग कोणताही बदल करणार नाही.
नवीन ताज्या घडामोडी 👇: Maharashtra Local Elections 2025: दिवाळीनंतर सुरू होणार सत्तेसाठी जबरदस्त लढाई, नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारीच ठरणार !📢 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांकडे सर्व राजकीय पक्षांनी आपले लक्ष केंद्रित केले असून, दिवाळीनंतर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा तापमान वाढणार हे निश्चित दिसत आहे.
Maharashtra Land Records Recruitment 2025: महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात 903 पदांसाठी मेगा भरती
mhdunews #mhdusocial #MaharashtraElections #LocalBodyPolls #NagarParishad2025 #PoliticalNews

