पुणे – मोशी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारले जात असून, त्याचा भव्य सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. या स्मारकाचे वैशिष्ट्य म्हणजे, जगातील सर्वात उंच Statue म्हणून Guinness Book of World Records मध्ये नोंद झाली आहे.
या सोहळ्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराचे नाव सुवर्णपानात कोरले जाणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
सविस्तर व्हिडिओ बघा 👇
या स्मारकाचा London Book of Records मध्ये देखील समावेश करण्यात आला आहे. भारताचे प्रतिनिधी म्हणून अविनाश सुकंडे व उत्तमराव मांढरे यांनी याची नोंद केली.
या भव्य कार्यामागे हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आणि सर्व सदस्यांचा मोठा पुढाकार आहे. विशेष म्हणजे हा सोहळा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते पार पडला.
हे स्मारक केवळ पिंपरी-चिंचवडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे वैभव ठरणार असून, भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाचे हे स्मारक प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
अशाच आणखी स्थानिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

