Girish Mahajan Taunted Dada Bhuse :
नाशिक : नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या तिढ्यावरून राज्यातील राजकारणात टोलेबाजीयुद्ध रंगले आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री दादा भुसे यांनी, “हा वाद आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच न्यावा लागेल,” असे मिश्कील वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावर आता मंत्री गिरीश महाजन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख करत भुसे यांना डिवचले आहे.
Girish Mahajan Taunted Dada Bhuse :
अमळनेर येथे आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री महाजन म्हणाले,
“भुसे साहेबांच्या म्हणण्यानुसार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे घनिष्ट संबंध असतील! त्यामुळे ते ट्रम्प यांना नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सोडविण्याची विनंती करतील किंवा फोन करून काही तरी करा, अशी विनवणीही करतील.”
महाजन पुढे म्हणाले,
“माझे तसे कोणतेच संबंध अमेरिकेशी नाहीत. मी तिकडे गेलोही नाही. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत किंवा ट्रम्प यांच्याविषयी काही चर्चा झालेली नाही,”
या वक्तव्याने नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या तिढ्याला नवे वळण मिळाले आहे.
🏛️ Guardian Minister’s Nashik Politics:
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पालकमंत्रिपदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
भाजपचे गिरीश महाजन, शिंदे गटाचे दादा भुसे, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, आणि माणिकराव कोकाटे — हे चारही नेते नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत.
तिढा न सुटल्याने चारही मंत्र्यांना कुंभमेळा मंत्री समितीत स्थान देण्यात आले असून, गिरीश महाजन यांना समिती प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे.
आता नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा नेमका कधी सुटणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
MHDU News : Vishal Bhadane Girish Mahajan Taunted Dada Bhuse
#dadbhuse #girishmahajan #polics #nashik #pune # khandesh #breakingnews


[…] […]
[…] […]