Girish Mahajan Confuse Nashik Politics
नाशिक (MHDU News ) : राजकारणात सध्या नाशिकमध्ये मोठी हालचाल सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बंद दरवाज्याआड चर्चा केल्यानंतर, राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. (Girish Mahajan Confuse Nashik Politics)
भुजबळ यांनी येवला, लासलगाव, नांदगाव आणि मनमाड या भागांतील आगामी नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपला सोबत घेऊन लढण्याचा प्रस्ताव मांडला असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यांच्या मते, येवला परिसरात शिवसेनेची (शिंदे गट) ताकद कमी आहे आणि तेथील गट थेट विरोधात असल्याने भाजपसोबत युती करणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
दरम्यान, भुजबळ आणि आमदार सुहास कांदे हे दोघेही कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असल्याने, गिरीश महाजन यांच्या समोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे. दोन्ही बाजूंना न दुखावता ‘मधला मार्ग’ काढणे त्यांच्यासाठी सोपे नाही.
भाजपचे निवडणूक प्रमुख डॉ. राहुल आहेर यांच्यासोबत चर्चा निष्फळ ठरल्यानंतर भुजबळ यांनी थेट गिरीश महाजन यांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजप एकत्र येणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांनी या चर्चांना वेगळा अर्थ देत स्पष्ट केले की, (Girish Mahajan Confuse Nashik Politics)
“महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाणार आहे. कांदे आणि भुजबळ दोघांशीही माझी चर्चा झाली असून, सर्वांना सोबत घेऊन मधला मार्ग काढू,” असे ते म्हणाले. (Girish M)ahajan Confuse Nashik Politics
या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. ११ नोव्हेंबर) मुंबईत पुन्हा बैठक होणार असून, त्या बैठकीत महाजन नेमका काय तोडगा काढतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Girish Mahajan Confuse Nashik Politics)
नाशिकमध्ये राजकारणाचे तापमान चढले असून, “इकडे कांदे, तिकडे भुजबळ” अशी स्थिती निर्माण झाल्याने महाजन यांच्या ‘राजकीय संतुलन’ कौशल्याची आता खरी कसोटी लागणार आहे.
नाशिकराजकारण #गिरीशमहाजन #समीरभुजबळ #सुधीरकांदे #भाजपनाशिक #राष्ट्रवादी #युती #नाशिकअपडेट #politicsnews #nashikpolitics #mahajan #bhujbal #ncp #bjp #mhdu #mhdunews #mhdusocial
नाशिक मनपा भरतीवरून राजकारण तापले; खा. राजाभाऊ वाजे आणि आ. देवयानी फरांदे आमनेसामने


[…] इकडे कांदे, तिकडे भुजबळ! नाशिकमध्ये यु… […]
Alright folks, let me tell ya, 365betcassino ain’t messing around. They’ve got the games, they’ve got the vibes, and honestly, I’ve had some pretty sweet wins here. Give it a whirl, you might just surprise yourself! Check ’em out over at 365betcassino.
VN8888m, huh? First time hearing about it! I will try it. I like exploring what’s hot on the market. Let me know if you’ve tried it and what you think!vn8888m