Girish Mahajan Chhagan Bhujabal Dada Bhuse one stage
नाशिक – शहरातील राजकारणात सध्या पालकमंत्रीपदाचा ताण वाढलेला असताना, एकमेकांना नेहमीच राजकीय चुरस देणारे तीन दिग्गज नेते — गिरीश महाजन, छगन भुजबळ आणि दादा भुसे — हे तिघे पुन्हा एकदा एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.
कुंभमेळा मंत्री समितीच्या अलीकडच्या बैठकीनंतर आता हे तिन्ही मंत्री सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र हजेरी लावणार आहेत. पालक मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले हे तिन्ही दिग्गज या कार्यक्रमात एकत्र येणार असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. (Girish Mahajan Chhagan Bhujabal Dada Bhuse one stage)
हा सोहळा गुरुवारी दुपारी ४ वाजता कॉलेज रोडवरील गुरूदक्षिणा सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाचे वितरण जलसंपदा व कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या बाबतची माहिती संयोजक आकाश पगार यांनी दिली.
मागील पाच वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता. (Girish Mahajan Chhagan Bhujabal Dada Bhuse one stage)
दरम्यान, आगामी कुंभमेळ्यामुळे नाशिकचे पालकमंत्रीपद हे सत्ताधारी महायुतीसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा ठरले आहे. सत्तास्थापनेनंतर अनेक महिने उलटूनही कोणाला ही जबाबदारी मिळणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे. सुरुवातीला महाजन यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती जाहीर झाली होती, मात्र मित्रपक्षांच्या नाराजीनंतर ती स्थगित करण्यात आली.
यानंतर महाजन यांनी कुंभमेळा मंत्रीपदाची धुरा सांभाळत काम सुरू केले. त्याचवेळी राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे आणि भुजबळ यांनी पालकमंत्रीपदावर आपला दावा सांगितला. गतवेळी ही जबाबदारी सांभाळणारे दादा भुसे यांच्या नावावर शिंदे गट ठाम आहे. (Girish Mahajan Chhagan Bhujabal Dada Bhuse one stage)
महाजन यांच्या विरोधात तडजोड न करण्याचा निर्णय भाजपने घेतल्यानंतर कुंभमेळा नियोजनासाठी स्वतंत्र मंत्री समिती स्थापन करण्यात आली. तरीदेखील पालकमंत्रीपदाचा पेच कायम आहे. कुंभमेळामंत्री म्हणून महाजन यांनी प्रशासनात आपली पकड मजबूत केल्याने ते प्रत्यक्षात पालकमंत्रीप्रमाणेच सक्रिय असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आता हे तिन्ही स्पर्धक मंत्री एकत्र एका कार्यक्रमात दिसणार असल्याने, “सुविचार गौरव” ठरेल की “राजकीय सामना”, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
MHDU News : Vishal Bhadane



[…] […]
Hey! Recently gave cashhoardslot a spin. It seems like a niche slot game, definitely seems designed for a certain type of player. I want to try some more slots later cashhoardslot.
X777hh looks interesting! Checking it out now, might be my new place for some fun online action. Take a look: x777hh